सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पोलिस निरीक्षकांचे स्वागत

Share Now

253 Views

रोहा (वार्ताहर) रायगड जिल्ह्यातील युवकांची आदर्श संस्था असलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रोह्याचे नवीन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे स्वामी विवेकानंद व भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांचे पुस्तक देऊन रोहा नगरीत स्वागत करण्यात आले. सुराज्यच्या एक राखी देशासाठी व राष्ट्ररक्षाबंधन २०२१ या उपक्रमाचा कार्यक्रम अहवाल पुस्तिका संजय पाटील यांच्या हस्ते यावेळी सादर करण्यात आली.

यावेळी सुराज्य अध्यक्ष रोशन चाफेकर, कार्याध्यक्ष मयुर धनावडे,खजिनदार किरण कानडे, सल्लागार कमलेश चांदेकर, रोहा शहर अध्यक्ष वेदांत देशमुख, धाटाव विभाग अध्यक्ष अनिकेत पाशीलकर,रोहा सचिव संकेत देसाई, निखिल जंगम हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *