अष्टमी येथे आज रक्तपेढी व बहुऊद्देशिय इमारत भूमिपूजन सोहळा, खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

Share Now

544 Views

रोहा (वार्ताहर) रोहे अष्टमी नगरपरिषदेतर्फे अष्टमी येथे शनिवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता रक्तपेढी,बहुऊद्देशिय इमारत व अष्टमी मुख्य प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्याला रायगडचे खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आ. अनिकेत तटकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधीक्षक डॉ. अंकिता खैरकर, रोहा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष रायगड भूषण डॉ. फरीद चिमावकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यासाठी डॉ. विश्वनाथ देशमुख, अष्टमी मोहोल्ला अध्यक्ष शफी पानसरे, अष्टमी ग्रामस्थ अध्यक्ष महादेव साळवी, माजी नगराध्यक्षा भारती पिंपळे, माजी नगरसेविका अपर्णा पिंपळे, पुजा पोटफोडे, शाहीन दर्जी, संजीवनी पोटफोडे, माजी नगरसेवक सलील खातू, अल्ताफ चोरडेकर, शब्बीर नाडकर, जैनुद्दीन लंबाते, प्रदीप बोथरे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.

नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचे होमग्राउंड असलेल्या अष्टमीत हा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमाची उत्कंठा वाढली असून रोहे अष्टमी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे बिगूल देखील वाजलेले असल्याने मान्यवर नक्की काय बोलणार ? आघाडी, युती संबंधी काही सूतोवाच करणार का ? यासंबंधी तर्कवितर्काना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *