पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, कोलाड सपोनि सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी

Share Now

624 Views

कोलाड (कल्पेश पवार) किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता.परंतु कोलाड सपोनि सुभाष जाधव व त्यांच्या टिम ने मोठया शिताफीने आरोपींला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (31 ऑगस्ट) रोजी रात्री नऊ ते बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री नऊ यादरम्यान ही घटना घडली. आंबिवली आदिवासीवाडी (पो. कुडली, ता.रोहा) येथे राहणार्‍या चंदर सुदाम वाघमारे याचे पत्नी कुसुम हिच्याशी कोळशाच्या खाणीच्या धंद्यावर जाण्यावरुन भांडण झाले. हा वाद विकोपाला पोहोचला. संतापाच्या भरात चंदरने पत्नी कुसुमला हाताबुक्क्याने,लाथेने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुसूमचा मृत्यू झाला.आरोपी चंदर सुदाम वाघमारे रा.आंबिवली आदिवासीवाडी हा गुन्हा केल्यापासून फरारी झाला होता त्याच्याकडे मोबाईल वापरात नव्हता कोणतेही आधारकार्ड नव्हते कसंबसं एक फोटो मिळालं होता त्या आधारे पो स्टे मधील अधिकारी सुभाष जाधव व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासून सतत घटनास्थळ व आसपासच्या गाव व जंगल भागात शोध घेता आरोपी जवळच्या जंगलात एका झाडावर लपून बसलेला दिसला असता सर्व अधिकारी व अंमलदार यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतला असून कोलाड पो.स्टे. ला आणून पुढील तजवीज करून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *