मुरुड जंजिरा येथील छायाचित्रकार नितीन शेडगे यांना आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मिळाले गोल्ड मेडल

Share Now

354 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) दिल्ली येथील जेसीएम फोटोग्राफिक सोसायटीने आयोजित २०२१ आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडचे छायाचित्रकार नितीन शेडगे यांना फोटो ट्रॅव्हल विषयात ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल’ या फोटोला गोल्ड मेडल मिळाले आहे.

या स्पर्धेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या विविध देशांतील ३४४ छायाचित्रकारांनी भाग घेतला होता, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिका, इंडियन इंटरनॅशनल फोटोग्राफिक कौन्सिल, फोटोग्राफिक फेडरेशन ऑफ इंडिया व वाईल्डलाइफ फोटोग्राफी असोसिएशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या स्पर्धेत मोनोक्रोम फोटोग्राफी, कलर फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी व फोटो ट्रॅव्हल हे विषय ठेवण्यात आले होते. सर्व विषयांवर सुमारे ३५०० फोटोंवर ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पार पडली.

सदर स्पर्धेत मुरुडचे छायाचित्रकार नितीन शेडगे यांना फोटो ट्रॅव्हल विषयात ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल ‘ या फोटोला गोल्ड मेडल मिळाले असून इतर विषयात चार फोटोना एक्सेपटन्स मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *