नागावं येथे विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत ७२५ ग्रामस्थांचे लसीकरण एक दिवसात पूर्ण

Share Now

211 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) अलिबाग तालुक्यातील नागावं ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी दिनांक 3 सप्टेंबर3021 रोजी विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत ७२५ ग्रामस्थांचे लसीकरण एक दिवसात पूर्ण केले.
विशेष लसीकरण मोहीमेसाठी नागावंचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या प्रयत्नाने २०० डोस, विद्यमान सरपंच निखिल मयेकर यांच्या प्रयत्नाने ३०० डोस व सदस्या डॅा सौ.सुहानी आपटे यांच्या प्रयत्नाने २०० डोस लस उपलब्ध झाली.

आजची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत व सहकार्य करणाऱ्या सर्व स्पॅान्सर्स, नागांव ग्रामस्थ, पंचायत सदस्य, पंचायत कर्मचारी, अश्विनी हॅास्पिटल-चौल व डॅा.ओक व कळत नकळतपणे मदत केलेल्या सर्वांचे सरपंच निखिल मयेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहे. तसेच ज्यांना कोविड लस हवी असल्यास व ग्रामपंचायत कार्यालयात नावनोंदणी न केलेली असल्यास पुढील येणाऱ्या लसीसाठी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन नोंदणी करावी. सर्वांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सरपंच निखिल मयेकर यांनी माहिती देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *