रोहा शहर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चाळके, सरचिटणीसपदी प्रकाश कोळी, खजिनदारपदी महेंद्र मोरे यांची निवड

Share Now

366 Views

कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसींच्या न्यायी हक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी संघर्ष समन्वय समितीची रोहा शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका अध्यक्ष सुरेश मगर, सरचिटणीस महादेव सरसंबे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अॅड.मनोजकुमार शिंदे,सल्लागार काशिनाथ धाटावकर, नगरसेवक महेश कोलाटकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर अध्यक्षपदी रवींद्र चाळके, सरचिटणीसपदी प्रकाश कोळी, खजिनदारपदी महेंद्र मोरे यांच्यासह शहर कार्यकारिणी ची निवड करण्यात आली आहे.

ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका कार्यकारिणी सहसचिव महेश बामुगडे, सदस्य मंगेश रावकर, प्रफुल्ल पडवळ,धाटाव विभाग अध्यक्ष अमित मोहीते, सरचिटणीस लक्ष्मण मोरे,उपसरपंच अरविंद मगर, राजु कोळी,विनोद कोळी,सागर बोबडे, महेश मोहीते,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मधुकर पाटील यांनी ओबीसींनी एकत्रीत येण्याची गरज असुन रोहा शहरात रवींद्र चाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओबीसी संघर्ष समन्वय समिती ची संघटना बांधणीचे काम करण्याचे सांगितले. सुरेश मगर यांनी ओबीसीची जातीनीय जनगणना करण्याची मागणी करीत जातीनीय जनगणना केल्यास ओबीसींची संख्या ६० टक्केवर जाईल असे सांगितले. महादेव सरसंबे यांनी ओबीसीनी आपल्या न्यायी हक्कासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले.

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर कार्यकारिणीच्या निवडीमध्ये अध्यक्ष रवींद्र सुधीर चाळके, उपाध्यक्ष हर्षद साळवी, प्रेषित बारटक्के, मनोहर धाटावकर, गितराज म्हस्के, सरचिटणीस प्रकाश कोळी, सहसचिव संदेश सरणेकर, भाई सुर्वे, जितेंद्र साळुंखे, खजिनदार महेंद्र मोरे, सदस्यपदी सूर्यकांत कोलाटकर, विनायक चिखलकर, संतोष हातकमकर, शेखर सकपाळ, अमित पवार यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरीत कार्यकारिणी लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष रवींद्र चाळके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *