स्व.चंद्रकांत आपणकर गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Now

499 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीमधील खारी हनुमान मंदिर सभागृह येथे आज शुक्रवार दिनांक.०३ सप्टेंबर २०२१ रोजी आदर्श शिक्षक जेष्ठ समाज सेवक स्वर्गीय चंद्रकांत गोविंद आपणकर गुरुजी (चंदूभाई) यांच्या प्रथम (पुण्यस्मरण) स्मृती दिनाचे औचित्य साधत आपणकर परीवाराच्या माध्यमातून खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील गरजू व गरजवंत नागरिकांकरता जेनेरिक मेडिकल प्रा.लिमिटेड यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर,राज्य रक्त संक्रमण परिषद ब्लड बँक – अलिबाग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच नाईटींगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व सतेज आपणकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यां करिता विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
   
सदर रक्तदान शिबिर या सामाजिक,आरोग्य विषयक तपासणी शिबिराचा शुभारंभ प्रथम दिप प्रज्वलन करीत आदर्श शिक्षक स्व.आपणकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत खारी गावचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे, गुरूनगर अध्यक्ष पी.ए.देशमुख, ग्रूप ग्रामपंचायत खारगाव माजी सरपंच श्रीमती गुलाबताई आपणकर, डॉ.तेजकुमर आपणकर, विद्यमान सरपंच सलोनी आपणकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष सतेज आपणकर, रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रक्त केंद्र प्रमुख डॉ.दिपक गोसावी, जेनेरिक मेडीकल प्रा.ली.रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ.कदम मॅडम, फरीद अफवारे(जनसंपर्क अधिकारी जिल्हा रक्त केंद्र अलिबाग), संतोष ढाकणे, उमेश पाटील (अधि परिचारक – जिल्हा रुग्णालय अलिबाग) महेश घाडगे, खारगाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी दिलीप पाब्रेकर, माजी सरपंच प्रफुल्ल वाळेकर, माजी उपसरपंच महेंद्र शिर्के, राजिप प्राथमिक शाळा खारी, तारेघर, खारगाव, आरे खुर्द, आरे बुद्रुक, गौळवाडी, खातेली वाडी, कुंभोशि येथील शिक्षक वृंद विद्यार्थीवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत हद्दीतील सतेज आपणकर मित्रमंडळी सह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
      
एक सामाजिक भान ठेवून समाजाप्रती एक जबाबदारी लक्षात घेऊन रक्तदान सर्व श्रेष्ठ दान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने तब्बल ५२ रक्तदात्यांनी उत्स्फर्तपणे रक्तदान केले. तसेच जेनेरीक मेडिकलस् प्रा.लिमिटेड यांच्या सौजन्याने आयोजित आरोग्य विषयक (ब्लड प्रेशर तसेच मसाज थेरेपी तपासणी) शिबिरास देखील उत्तम प्रतिसाद मिळाले तर एकूण १५१ शालेय विद्यार्थ्यांना वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सिल फूटपट्टी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
     
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजविणारे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी दिलीप पाब्रेकर, आरोग्य सेविका गौरी पंडीत, अंगणवाडी सेविका मिताली खिरीट यांचे “कोरोना योद्धा”म्हणून प्रस्तीपत्रक देत यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आले.याप्रसंगी सतेज आपणकर,श्रीमती.गुलाब ताई आपणकर यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त करताना स्व.आपणकर गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावविभोर अश्रूंनी आपल्या भावना व्यक्त करीत वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात संकल्प केले. जेनेरिक मेडीकल प्रा.ली.रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ.कदम मॅडम यांनी जेनेरिक मेडीकलचे विशेष महत्त्व पटवून कुटुंबाचे आरोग्य विषयक अधिक आर्थिक खर्च न करता स्वस्त औषधे, जेनेरिक मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहेत, तर कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी सन – १९९२ ते २०२० पर्यंत आदरणीय स्व.आपणकर गुरुजी यांच्या सोबत काम करीत असताना नेहमीच सकारात्मक सहकार्य, उत्तम मार्गदर्शन मिळत होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ.तेजकुमार आपणकर, सतेज आपणकर,राजेंद्र खिरिट,गिरीष पंडीत,रमेश पवार,मनोज मांजणेकर,महेश शिर्के,प्रमोद टिकोणे,गिरीष खरीवले,महादेव ठाकूर,रुपेश काळे,विश्वनाथ कोळी आदी मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *