रक्तपेढी, बहुऊद्देशिय इमारत,स्वागत कमान भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांचे हस्ते संपन्न

Share Now

539 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहे अष्टमी नगरपरिषदेतर्फे अष्टमी येथे शनिवारी रक्तपेढी,बहुऊद्देशिय इमारत व अष्टमी मुख्य प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्षा शेट्ये, सर्व सभापती नगरसेवकांसह अष्टमी मोहोल्ला अध्यक्ष शफी पानसरे, अष्टमी ग्रामस्थ अध्यक्ष महादेव साळवी, माजी नगराध्यक्षा भारती पिंपळे, माजी नगरसेविका अपर्णा पिंपळे, पुजा पोटफोडे, शाहीन दर्जी, संजीवनी पोटफोडे, माजी नगरसेवक सलील खातू, अल्ताफ चोरडेकर, शब्बीर नाडकर, जैनुद्दीन लंबाते, प्रदीप बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रायगडचे खा. सुनिल तटकरे यांचे संकल्पनेतून, पालकमंत्री ना. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरेंच्या नेतृत्वाखाली रोहा अष्टमी नगरपरिषदमध्ये विकासात्मक व लोकोपयोगी विविध कामे मार्गी लागत आहेत. रोहा तालुक्यासह लगतच्या तालुक्यांतील अपघातग्रस्त व अन्य रुग्णाना रक्ताची गरज लागल्यास ते मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. प्रसंगी वेळीच रक्त न उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले निकटवर्तीयांनी मुकावे लागत होते. रोहामध्ये अत्याधुनिक रक्तपेढी उपलब्ध करण्याचा निर्धार पालकमंत्री ना. आदिती तटकरेंनी वेळोवेळी व्यक्त केला होता. रोहेकरांना दिलेले हे आश्वासन आज पूर्ण करत स्व. द. ग.तटकरे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या रक्तपेढीचे भूमिपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले. यासोबतच अष्टमीकरांचेसह सर्व रोहेकरांना आदरार्थी असणारे स्व. शंकर(नाना )बाबूराव पोटफोडे यांचे नावाने उभारण्यात येणाऱ्या अष्टमी प्रवेशद्वार स्वागत कमान उभारणिचे भूमिपूजन ही त्यांचे हस्ते करण्यात आले. या दोन्ही वास्तू येथे उभारण्यात येणार असल्यामुळे अष्टमी नाक्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यामुळे यासोहळ्यासाठी तमाम अष्टमीकर नागरिक मोठ्या उत्साही वातावरणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *