रोहा मध्ये बँक ऑफ इंडियाचा ग्राहक संपर्क कार्यक्रम संपन्न

Share Now

171 Views

रोहा (प्रतिनिधी) बँक ऑफ इंडिया शाखा रोहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ग्राहक संपर्क कार्यक्रम संपन्न झाला. रोहा शहराच्या आई एकवीरा शाभगृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास रमन पारकर, देवकांत मिश्रा मुख्य प्रवरतक शाखा रोहा, महेन्द्र मराठे, एस यू डी लाईफ हेड ऑफिसर, चित्त रंजन कुमार मुख्य प्रवरतक धाटाव, प्रदीप कुमार झा प्रवरतक कोलाड, स्मिता जाधव मॅनेजर पाली, माजी ब्रांच मॅनेजर आर.डी.सी. अनंत गंगाधरे, संतोष पवार, शैलेश शिर्के अंकुश भोईर
यासह रोहा मधील सचिन शेडगे, रामचंद्र नाकती, राकेश मोरे मा. सरपंच अनंता देशमुख, घनशाम कराळे, विठ्ठल मोरे, राहुल मोहिते,चंद्रकांत बामुगडे,
मान्यवरांसह रोहा ब्रांचचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी यांनी बँक निर्माण केली, बँक ऑफ इंडिया बँकेला 116 वर्ष पूर्ण झाले आहेत ,भारतात अग्रगण्य बँक आहे, रोहा शाखेमध्ये उत्तम ग्रहाक सेवाआल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बँक ऑफ इंडिया शाखा रोहा ग्राहकांना उत्तम सेवेसह सर्वसामान्य ग्राहकांची काळजी घेते, कोरोना काळात ही बँकेने ग्राहकांना सेवा दिली. ग्राहक संपर्क कार्यक्रमात शासनाच्या विवीध योजनांच्या महितीसह व्यवसायांना माध्यम उद्योग, लघु उद्योग यांसाठी ही मोठ्या प्रमाणात कर्ज सेवा उपलब्ध आहे. तसेच कोरोनामुळे ज्यांचे नुकसान झाले असेल त्याला आर बी आय मदत करणार आहे, कर्ज फेडीसाठी मुदत वाठ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *