कोलाड रोहा महामार्गावर अपघात, अर्तिका गाडीची विद्युत खांबाला जोरदार धडक

Share Now

598 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा कोलाड राज्य महामार्गांवर धाटाव औद्योगिक क्षेत्रातील हॉटेल त्रिमूर्ती शेजारी कोलाडकडून रोहाकडे येणाऱ्या इंडिका गाडीने व्हॅगनार गाडीला जोरदार ठोकर दिली. त्यावेळी मार्गालगत उभा असलेला विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाला जोरदार धडक देऊन हा अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने अपघातात जीवितहानी टळली. विद्युत खांब हा मध्येच तुटून आर्तिका गाडीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी जितेन्द्र रामचंद्र गावडे वय वर्ष 38 राहणार आंबेवाडी कोलाड रोहा हे कोलाडकडे जात असताना हितेंद्र जगन्नाथ कोळी राहणार कुलाबा मुंबई हे आर्तिका गाडी एमएच 02 डीएन 1380 याने भरधाव वेगात गाडी चालवत विरुद्ध दिशेला जाऊन वॅगनार गाडी नंबर एमएच 06 बीयू 6791 या गाडीला धडक देत रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्दुत पोलाला जोरदार धडक दिली. या अपघातत सदरील दोन्ही गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले तर दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरच्या अपघाताचा अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *