रोह्यात पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन,सुहासिनीचे वाण घेण्यात महीलावर्गाची लगबग

Share Now

317 Views

धाटाव (शशिकांत मोरे) रोह्यात गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिला वर्गाची चांगलीच लगबग पहावयास मिळाली.नवनवीन विविध रंगाच्या साड्या परिधान करून आज गौराईचे पूजन करताना एकत्र सुहासिनिचे वाण घेण्यात महिलांचा चांगलाच उत्साह पहावयास मिळाला.

कोकणात होळी सणाबरोबर गौरी,गणपती सणाला अनन्य साधारण महत्व आहे.गणपती सणात पूजा आर्चा,आरती बरोबर नैवेद्य आणि रात्री पारंपारिक पद्धतीची जुनी गाणी म्हणत जागरण अशा सर्व बाबीत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. गणरायाच्या आगमना बरोबर काल गौराईचे आगमन झाल्या नंतर आज सकाळ पासून गौरीचे पूजन करण्यासाठी विविध फुलांनी सजावट करून पूजनासाठी महिलांची लगबग पाहण्याजोग होती.आपल्या घरात सुख,समृध्दी नांदावी यासाठी गौराईचा ओवसा सुहासिनीनी(वाण)घेतले.

दरम्यान जुन्या जाणकार जेष्ठ महिलानी आपल्या सुरेल आणि संगीतमय गाणी बोलून गौराईचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी मार्गदर्शन केले. तर याप्रसंगी नवविवाहित दाम्पत्यांनी आपल्या नातेवाईक,सगे सोयरे मंडळी कडे जावून सुहासिनीचे वाण घेतले.एकंदरीत या पारंपारिक पद्धतीने झालेल्या मोठ्या आनंदमय वातावरणात असंख्य महिला वर्गानी आपला आनंद द्विगुणत केल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *