पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसनिमीत्त रोह्यात विविध उपक्रम

Share Now

700 Views

धाटाव (वार्ताहर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त रोह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक (१७) रोजी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शंभर नागरिकांना पहिला डोस व शंभर नागरिकांना कोविल्डशिडचा दुसरा डोस देण्यात आला. तर रोहा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून फळे वाटप करण्यात आले.

कोलाड लेप्रसी येथील कुष्ठरोगी व बधिर रुग्ण राहत असल्याने तेथील सायकोटीक तज्ञ डॉ. सागर बसवते याच्या मागणीनुसार रुग्णांच्या आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने ऑक्सी मिटर व टेंपरेचर मोजण्याचे मशीन प्रंतधानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आले. रोठ ब्रु. ग्रामपंचायतीमधील उर्वरित रहिवाशांचे लसीकरण करण्यात आले. देशातील प्रत्येक सामान्य कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण देण्याचे काम पंतप्रधान मोदीजीच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे अशा प्रतिभावनशाली पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला लोकांना लस आली हेच आमचे भाग्य समजतो असे दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शंभर नागरिकांना पहिला डोस शंभर नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे आज माझ्या गावातील नागरिकांचे 100% लसीकरण झालेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज हे चित्र मोदीजीमुळे बघायला मिळाले आहे असे रोठ बुद्रुक सरपंच यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *