धाटावमध्ये साखर चौथीच्या गणरायाचे जल्लोषात आगमन, परिसरातील वातावरण भक्तिमय

Share Now

205 Views

धाटाव (शशिकांत मोरे) भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी नंतर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या साखर चौथीच्या गणरायाचे धाटावमधे मोठ्या जल्लोषात आगमन झाले.थाटामाटात आगमन झालेल्या देवबाप्पाचे मखरात विराजमान झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा,महाआरती करण्यात आली.

साखर चौथ हे एक व्रत आहे, घरोघरी चतुर्थी पुजली जाते,यानिमित्ताने आज धाटावचा राजा मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही धाटावच्या राजाचे आज आगमन झाले. गावामध्ये पांडुरंग माने, पांडुरंग जाधव तर विष्णूनगरमधे ग्रामस्थ व महिला मंडळाच्या वतीने व बारसोली येथे बापुजिदेव मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी साखरचौतीच्या गणरायाची प्रतिष्ठपना करण्यात आली होती. यासर्वच ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या संक्रमण काळात महाराष्ट्रात रक्ताचा पुरवठा कमी असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील तरुण वर्गाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान ३५ रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले.तर रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग येथील डॉ.गोसावी यांनी मार्गदर्शन केले.याकामी आदेश भोकटे,राहुल रटाटे यांच्यासह तरुण मित्रांनी विशेष मेहनत घेतली.या लोकोपयोगी उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.एकंदरीत साखर चौथीच्या गणरायाचे आज आगमन झाल्याने या परिसरातील वातावरण भक्तिमय झाल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *