नागोठणे राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्षपदी संतोष कोळी यांची निवड

Share Now

232 Views

नागोठणे (याकुब सय्यद) खा. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कोळी यांची नागोठणे राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना संतोष कोळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ध्येय धोरणांचे पालन करून संघटना वाढीकरिता अविरत प्रयत्न करताना मोठ्यांचे आशीर्वाद, साहेबांचे मार्गदर्शन व लहानांचे सहकार्य घेत पुढील वाटचाल करणार असल्याचे म्हणाले. संतोष कोळी यांची नागोठणे विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *