दमखाडी ग्रामस्थांना गणेशोत्सवा निमित्त पालकमंत्र्यांची भावनिक भेट, सामाजिक सभागृहासाठी १० लाखांच्या निधीचे पत्र

Share Now

607 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी साखर चतुर्थी निमित्ताने साजरा झालेल्या गणेशोत्सवा निमित्ताने दमखाडी येथे स्थानापन्न झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.आपल्या गावातील पुरातन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार होत त्यासमोर सामाजिक सभागृह व्हावे अशी दमखाडी ग्रामस्थांची मनोमन इच्छा होती. आपल्या ग्रामस्थांची ही भावना नगरसेवक महेश कोलाटकर व गीता पडवळ यांनी खा. सुनिल तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांसह पालकमंत्री यांचेकडून व्यक्त केल्या होत्या. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत साखर चतुर्थी गणेशोत्सवात दमखाडी येथे पालकमंत्री दर्शनास आल्या असता सामाजिक सभागृहासाठी १० लाखांच्या निधीचे पत्र ग्रामस्थांना देत त्यांना यानिमित्ताने भावनिक भेट दिल्यामुळे ग्रामस्थांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे.

दमखाडी येथे शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पालकमंत्री ना. आदिती तटकरे दर्शनासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी हे निधीचे पत्र ग्रामस्थांना दिले यावेळी नगरसेवक महेश कोलाटकर, सभापती गीता पडवळ, नरेश पडवळ, काशिनाथ धाटावकर, मनोहर धाटावकर, समाधान शिंदे, महेश नागावकर, प्रफुल्ल पडवळ, शाम धाटावकर, उल्हास भाटकर, नितीन कोल्हटकर यांचेसह जेष्ठ नागरिक, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *