कृषी कायद्यांविरोधात भारत बंद रोहा तालुक्यात सर्वहारा जनआंदोलन संघटनेने केली निदर्शने

Share Now

518 Views

चिल्हे (श्याम लोखंडे) देशातील केंद्र सरकार व मोदी सरकारचे शेतीविरोधी कायदे व चार कामगार श्रम संहीता या विरोधात आज सोमवारी 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यातील पाथरशेत आदिवासीवाडी ता,रोहा जि,रायगड येथे गावात मिरवणूक काढून व निदर्शणे करून भारत बंद व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा असल्याचे सदरील निदर्शन करण्यात आले असून याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिसून आले.

यावेळी तालुक्यातील विविध भागांतील धामणसई, खातेली वाडी व दिव ता,रोहा या ठिकाणी मोठी निदर्शने करत अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येऊन वस्ती वाड्यांवर प्रभात फेरीद्वारे व बॅनरच्या माध्यमातून केंद्र सरकार व मोदी सरकारने कामगार विरोधात व तीन कृषी कायदे आणले आहेत ते शेतकरी कष्टकऱ्यांना घातक असल्याने ते सरकारने रद्द करावेत व ते चालणार देखील नाहीत यासाठी हे आंदोलन व निदर्शने रोहा तालुक्यासह महाजने- अलिबाग,बेलेवाडी- मुरूड,
तासगांव- माणगांव, निजामपूर, पालसगाव खर्डी येथे ही हे आंदोलने करण्यात आले.

यावेळी सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सोपान सुतार यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष चंद्रकात गायकवाड, सचिव अंकुश वाघमारे, चंदा तिवारी, उमेश ढुमणे, यमुना वाघमारे, नथुराम वाघमारे, रघुनाथ नाईक यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले असून यात तालुक्यांतील वाड्यांवस्त्यांवरील शेतकरी व कष्टकरी नागरिक व महिला वर्ग सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *