जय भवानी मित्र मंडळ गावठण येथे साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न

Share Now

276 Views

रोहा (रविना मालुसरे) रोहा तालुक्यातील उपक्रमशील मंडळ म्हणून ख्याती असलेल्या जय भवानी मित्रमंडळ गावठण यांचेवतीने साखरचौथ गणेशउत्सवा निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाडच्या महापुरामध्ये अनेकांचे प्राण वाचवणारे, तारणहार ठरलेले संभे गावचे सुपुत्र महेश रामचंद्र सानप यांना देवदुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंडळाच्यावतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सत्कार पिंगळसई गावच्या रहिवासी सौ.रोशनी अमोल देशमुख यांना समाजसेविका म्हणून गौरविण्यात आले.त्यांच्या ” हेल्पर्स ऑफ दी हँडिक्राफ्ट” या संस्थेच्या माध्यमांतून समाजातील अपंग व्यक्तींसाठी मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात भजन सम्राट ह.भ.प.नरेश दळवी यांनी स्वागत गीत गायन करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार दत्ता सानप यांनी केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना एकूणच वातावरण भारावून गेले होते. मंडळाचे उद्दिष्ट समाजातील समाजासाठी कार्य करणाऱ्या,समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करणे हा आहे.हे ब्रीद घेऊन जय भवानी मित्र मंडळ गावठण मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *