फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ निसर्गाला धक्का बसेल असे कृत्य टाळणे खूप आवश्यक ! वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले

Share Now

232 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत वन्यजीव व वृक्ष संवर्धन या विषयी विविध कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरे केले जातात. आज फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ या अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमूलकुमार जैन,जेष्ठ पत्रकार मेघराज जाधव, ग्रीन वर्क ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भोपळे, किशोर शिरकांडे, वैभव पटवर्धन,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले कि, अभयारण्यातील वन्यजीव , पक्षी,विविध वृक्ष नैसर्गिक सौदर्य जपण्यासाठी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. भावी पिढीला जर वन्यजीव दाखवायचे असतील तर हे वन्यजीव यांचे संरक्षण होणे खूप गरजेचे आहे.यासाठी प्रत्येकानी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे व त्याप्रमाणे कृती होणे खूप आवश्यक आहे.निसर्गाला कोणताही धोका पोहचेल असे कृत्य प्रत्येकाने टाळले पाहिजे हे आपलेच आहे हि भावना जोपासली पाहिजे तरच सर्व व्यवस्थित टिकणार आहे याची जाण व भान ठेवले तर नैसर्गिक संपत्ती टिकेल असा विश्वास यावेळी भोसले यांनी व्यक्त केला आहे.

तसेच वन्यजीवांचा अधिवास वाचवणे व जतन करणे सुद्धा खूप आवश्यक आहे.मानवी वस्ती जंगल भागाच्या जवळ आली आहे त्यामुळे वन्यजीव याचे या ठिकाणी येणारच परंतु मानवाने समजूतदारपणे घेणे आवश्यक आहे. वन्यजीवांच्या जीवावर न उठता वन विभागाला तातडीने खबर दिल्यास संकट टळणार आहे. त्यामुळे वन्यजीव व मानवाचे सुद्धा संरक्षण होणार आहे. वन्यजीव हे राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राजवर्धन भोसले यांनी यावेळी सांगितले. ग्रीन वर्क ट्रस्ट चे अध्यक्ष निखिल भोपळे.यांनी सांगितले कि,निसर्गाची अन्नसाखळी कशी असते हे उपस्थितांना कृती मधून दाखवले.यासाठी त्यांनी निसर्गातील वन्यजीव यांच्या नावे विविध पात्रे तयार करून निसर्ग साखळीचे महत्व कसे असते हे उत्तमरीत्या पटवून दिले.

शासनाने ठरवलेले नियम प्रत्येक व्यक्तीने पाळले पाहिजे.या नियमांचा अनादर होता कामा नये.वन्यजीव व वृक्ष हे आपले मित्र आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हि आपली जबाबदारी आहे.वृक्षांपासून आपणाला ३० टक्के ऑक्सिजन मिळतो यासाठी वृक्षाचे संरक्षण करावे त्याच प्रमाणे झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचल व आभार न्यानदेव सुभेदार यांनी केले.यावेळी फणसाड अभ्यारण्याती सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *