बनावट नोटा बनवणा-या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले गजाआड

Share Now

372 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) अलिबाग मांडवा बायपास येथे कांदा व्यापारी यांस बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील जयदीप अजित घासे वय 26 वर्षे रा.मारुतीनाका ता.अलिबाग 2) सुमित सुनील बागकर वय 26 वर्षे रा.गोंधळपाडा ता.अलिबाग 3) कौस्तुभ चंद्रकांत गीजम वय 24 वर्षे रा.राजमाला ता.अलिबाग यांना अटककरीत त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिंटर, लॅपटॉप, शाई, कोरे कागद, एका बाजूस छापलेल्या 500 रुपये दाराच्या 63 नोटा किंमत 31,500/-रुपये , 200 रुपये दाराच्या 82 नोटा किंमत 16,400/-रुपये, 100 रुपये दाराच्या 22 नोटा किंमत 2200/-रुपये असे एकूण 49,900/- रुपयांच्या नोटा छापण्यात आलेल्या असून एकूण 27,500/-रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे.

दिनांक 29/09/2021 रोजी 08:00 वा.च्या सुमारास मौजे अलिबाग मांडवा बायपास रोड येथे एक काळया रंगाच्या सी.टी.100 मॉडेलच्या मोटार सायकलवरील दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादी अशोक विठ्ठल पोकळे रा.विदयानगर पो चेंढरे , अलिबाग यांचे जवळ येवुन 100 रूपये दराच्या 22 नोटा खोटया व बनावट आहेत हे माहीत असताना सुदधा त्या चलनात वापरण्यासाठी कपटीपणाने फिर्यादी यांचेकडुन दोन कांदयाच्या गोणी घेवुन फिर्यादी यांची फसवणुक बाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.151/2021 भा.दं.वि.क 489 (A), 489(B) प्रमाणे दिनांक 30/09/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास लागलीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांच्याकडे तपासकामी वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री.दयानंद गावडे यांनी तपास पथक तयार करून सदर गुन्हा घडल्या ठीकाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहून तसेच फिर्यादीत नमूद वर्णनांच्या इसमांचा शोध घेतला तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहती मिळवून त्याद्वारे आरोपित यांना लागलीच जेरबंद करण्यात आलेले आहे.

सदर गुन्ह्यात जयदीप अजित घासे *वय 26 वर्षे रा.मारुतीनाका ता.अलिबाग), सुमित सुनील बागकर (वय 26 वर्षे रा.गोंधळपाडा ता.अलिबाग), कौस्तुभ चंद्रकांत गीजम( वय 24 वर्षे रा.राजमाला ता. अलिबाग) यांना अटक करून गुन्ह्याच्या तपासात आरोपित यांनी गुन्ह्यात बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे प्रिंटर, लॅपटॉप, शाई, कोरे कागद, एका बाजूस छापलेल्या 500 रुपये दाराच्या 63 नोटा किंमत 31,500/-रुपये, 200 रुपये दाराच्या 82 नोटा किंमत 16,400/-रुपये, 100 रुपये दाराच्या 22 नोटा किंमत 2200/-रुपये असे एकूण 49,900/- रुपयांच्या नोटा छापण्यात आलेल्या असून एकूण 27,500/-रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. तसेच सदर आरोपित यांनी गुन्ह्याच्या तपासात गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्ह्यातील 03 आरोपित यांना दिनांक 05/10/2021 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास चालू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी दयानंद गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर, पोलीस उप निरीक्षक डोंबाळेम,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे गुन्हा प्रकटीकरण पथकातील सहाय्यक फौजदार भरत श्रीवर्धनकर, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार चिमटे, पोलीस हवालदार सुधीर मोरे, पोलीस हवालदार हंबीर, दबडे, पोलीस नाईक अक्षय जाधव, आवळे, पोलीस अंमलदार लांबोटे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *