रोह्यात बंदला अल्प प्रतिसाद, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येत बंदची हाक, रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा

Share Now

698 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) उत्तर प्रदेश लखिमपूर खेरी येथील न्याय मागणा-या शेतक-यांना चिरडून टाकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणी कॉग्रेस पक्षाने बंद पाळण्याची तयारी दर्शवली. मात्र रोह्यात या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. व्यापा-यांनी या बंदला ठेंगा दाखविल्याचे चित्र दिसून आले. जे व्यापा-यांची दुकाने बंद करायाला कार्यकर्ते पुढे होते त्यांची दुकाने मात्र चालू असल्याचे चित्र दिसले. महविकास आघाडीने मात्र रोह्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा पवित्रा घेतला असल्याचे दिसले. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येत बंदची हाक दिली. याशिवाय रोहा बाजारपेठेत तिन्हही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आपआपले झेंडे हातात घेऊन खांद्याला खांदा लावून व्यापा-यांची दुकाने बंद करण्यासाठी फिरताना दिसले. महत्वाचे म्हणजे आता आगामी रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा रोह्यात मात्र चांगलीच रंगली आहे.

आगोदरच कोरोना काळात कित्येक दिवस दुकाने बंद असल्याने रोह्यातील व्यापा-यांचे अर्थकारण बिघडले आहे. अश्यात बंद करायचे म्हणजे पोटाला कात्री लावल्यासारखी अवस्था व्यापा-यांची होते. त्यामुळे बंद करणारे कार्यकर्ते आपल्या दुकानासमोरुन निघून गेल्यावर व्यापा-यांनी आपली दुकाने तासाभरातच उघाडली. त्यामुळे अश्या बंद करणा-या कार्यकर्त्याला व्यापा-यांनी ठेंगा दाखवल्याचे चांगलेच चित्र पहायला मिळाले.

रोह्यातील राजकारण आता वेगळ्याच मोडवर येऊन ठेपले आहे. शिवसेना पक्ष आपली भूमिका मांडताना वरिष्ठांच्या सल्ल्याने जमवुन घेऊ असे सांगत आहे.तर राष्ट्रवादी पक्ष आपली हुकुमत एकतर्फी गाजवणार असल्याची चर्चा बाजारपेठेत दिवसेंदिवस रंगत आहे. यात खासदार सुनिल तटकरे काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष टाकणे गरजेचे आहे. बंदच्या निमित्ताने जरी सर्व एकत्र आले असले तरी रोह्यात इच्छुक उमेदवार काय कमी नाहीत. शिवसेना पक्ष तालुका प्रमुख आपली भूमिका ठाम मांडत नसले तरी एकिकडे तेही तडजोड झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू अशी भूमिका घेण्यास मागे हटणार नाही अशीही चर्चा आहे. यात पक्षाने तिकीट दिले नाही तर नाराज होणारे कार्यकर्ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. असेही ठाम सांगत आहेत. पण रोह्यातील महाविकास आघाडी कायम टिकवून ठेवायची असेल तर खासदार सुनिल तटकरे यांच्याजवळ चर्चेला बसल्याशिवाय सेनेला पर्याय नाही अशीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे रोहा बंद करण्यासाठी जसे शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हातात आपआपल्या पक्षाचे झेंडे घेऊन जसे फिरले तसेच आता निवडणुकिच्या काळातही प्रचारासाठी फिरतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *