रोहा तालुका सेवानिवृत्त प्रा. शिक्षक सेवाभावी संघ अध्यक्षपदी गजानन गुरव

Share Now

151 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघाची विशेष सभा रविवार १० ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढी च्या सभागृहात रायगड जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन मोरे यांचे अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत गजानन गुरव यांची रोहा तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
रोहा तालुका नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती.कार्यकारिणी निवड प्रक्रियेसाठी जिल्हा संघटक रामचंद्र बिरगावले यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

सभेची सुरुवात सर्व ज्ञात अज्ञात दिवंगतांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. विद्यमान सचिव नथुराम मोरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्च अहवाल वाचन केले. त्यानंतर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली.सर्वानुमते गजानन गुरव यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे नेतृत्वाखाली कार्यकारिणी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यामध्ये चिटणीस म्हणून प्रकाश वेदक, खजिनदार मुकुंद गंभे तर मार्गदर्शक म्हणून तुकाराम खांडेकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन मोरे यांचेसह सिताराम महाडीक, भानु डाकी, रघुनाथ पाटील रमाकांत जाधव, कमळाकर शिंगाडे यांनी मार्गदर्शन करत नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. सभेच्या शेवटी नूतन अध्यक्ष गजानन गुरव यांनी आभारप्रदर्शन केल्यानंतर सभेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *