महिला किसान दिनानिमित्त आज अलिबाग येथे महिला किसान मेळावा

Share Now

183 Views

अलिबाग (प्रतिनिधी) महिला किसान दिनानिमित्त कृषी मूल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचे जिल्ह्यातील इतर महिलांना मार्गदर्शन होण्यासाठी अलिबाग येथे आज शुक्रवार दि. 22 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय महिला किसान मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडील विविध योजनेबद्दल तसेच आंबा, काजू, कोकम, औषधी वनस्पती, भात, नाचणी, दूध, मासे इत्यादी प्रक्रिया उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *