रोहा-माणगाव स्थानकांवर अनेक एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा दिसणार, खा. सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

Share Now

324 Views

अलिबाग (प्रतिनिधी) रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी दिवा-रोहा (मेमू) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर रोहा-पनवेल, रोहा-दिवा पॅसेंजर यासह नेत्रावती एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा तसेच मांडवी एक्सप्रेसला व माणगाव स्थानकांवर ओखा एक्सप्रेस, बिकानेर एक्सप्रेस व मरुसागर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी प्रामुख्याने केली.

याबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अनुकूलता दर्शविली असून रोहा-अष्टमी तसेच निडी खारापटी येथील दोन्ही पूलांच्या कामासाठी तात्काळ निधी देण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर, मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरद गोयल, महाव्यवस्थापकांचे सचिव साकेत मिश्रा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *