रा.प.कर्मचा-यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी संप, मागण्या मान्य होईपर्यंत संप पुकारणार

Share Now

104 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रायगड परीवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने रोहा आगारातील सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून एकत्र संप पुकारला आहे. रोहा आगाराच्या गेटवर बसून आमच्या मागण्या मान्य करा असे निदर्शने देत संप सुरु ठेवला आहे.

रा.प.कर्मचा-यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी संप केला असल्याचे संघटनेचे पदाधिकारी म्हणाले. मागण्या मान्य होईपर्यंत संप पुकारणार असल्याचे मत कृती समितीचे सुरेंद्र येरुणकर म्हणाले. रायगड परिवहन मंडळातील पदाधिका-यांनी महाराष्ट्र राज्य कृती समिती स्थापन केली आहे. रा.प.कर्मचा-यांचे आर्थिक प्रश्न आहेत, त्या अर्थीक प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी कृती समिती मुंबई येथे आझाद मैदानावर मध्ये उपोषणाला बसली आहे. त्यांना रोहा आगारातील रा.प.कर्मचा-यांनी पाठिंबा दिला आहे. रा.प.कर्मचा-यांचा महागाई भत्ता 18 टक्के मंजूर आहे मात्र 12 टक्के दिला जातो, घरभाडे 1 टक्के कमी केला आहे, तसेच इंक्रिमेंट दर 1 टक्के इतका कमी केला आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा बंद आम्ही कायम ठेवणार असल्याचे मत एस.टी.कर्मचारी युनियनचे सुरेंद्र येरुणकर म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष अजय जाधव, सचिव सुरेंद्र येरुणकर, महाराष्ट्र एसटी कामगार सेना अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, सचिव अमोल अंभोरे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस अध्यक्ष श्रीधर गिजे, सचिव नरसिंह चोले, कास्टदीप महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना अध्यक्ष साईदास पवार, व रोहा आगारातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस.टी कर्मचा-यांना दोन हजार पाचशे इतका बोनस जाहिर केला आहे. हा दिवाळी बोनस तूटपुंजा आहे, शासनाच्या मिनीमम वेजस प्रमाणे पगार व बोनस आकारावा अशी मागणी आता एस टी सेवतील कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे मांडली आहे.

रोहा आगाराच्या बाहेर एस.टी.कर्मचारी यांनी कोण म्हणतंय घेणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कामगार एकजुटीचा विजय असो, एसटी शासनात विलीन झाली पाहिजे झालीच पाहिजे, हम सब एक है, अश्या घोषणा दिल्या. बंदमुळे प्रवाशांचे फार मोठे हाल झाले आहेत.एकिकडे ट्रेन बंद तर आता एसटी कर्मचा-यांच्या आर्थिक गोष्टीमुळे अचानक एस टी सेवा बंद झाल्याने अनेक प्रवासी एसटी स्टॉप वरुन परत घरी निघून गेले तर काही प्रवासी स्टँड वर बसून असल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *