दोन दुचाकींची धडक, एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share Now

437 Views

महाड(वार्ताहर) पल्सर मोटार सायकलने हिरो होंडा मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हिरो होंडा चालकाचा मृत्यू झाला. १ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिवघर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.

या अपघाताला जबाबदार असणाऱ्या पल्सर चालकाविरुध्द बिरवाडी एम आय.डी.सी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र शिवराम शेलार रा.रुपवली वय ५०, ता.महाड असे या अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने बिरवाडीकडून भिवघर येथे जात असताना, रौनक संजय येरापले (वय २४, रा. भिवघर, ता.महाड) या तरुणाने आपली पल्सर मोटारसायकल बेदरकारपणे चालवित शेलार यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात रवींद्र शेलार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर महाड येथील खाजगी रुग्णालयात उपचार करुन त्यांना मुंबईत हलविण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत जाहीर करण्यात आले. या प्रकरणी मोहन शंकर नगरकर (रा.रुपवली, गोळेकोंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रौनक येरापले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार जे.पी. गायकवाडी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *