नराधमाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत, तालुक्यात मुलींवर अत्याचार सुरुच

Share Now

1,207 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी घडली. अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच संताप व्यक्त झाला. रविवारी सायंकाळी आरोपी राकेश शिर्के याने अल्पवयीन मुलीला घरी नेवून लैंगिक अत्याचार केले, आरोपीला पोलिसांनी रात्री उशीरा रोहा अटक केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली,

रोहा तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठी वाढ झाली आहे. अत्याचाराचे सत्र सुरु असतानाच रविवारी सायंकाळी रोहा शहरातील पार्टे चाळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सायंकाळी 6 च्या सुमारास लहानगी अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवायिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या मुलीचा आजी-आजोबांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नराधम राकेश शिर्के वय 36 याने लहानगीला स्ततःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. आरोपीने सबंधीत मुलीवर अत्याचार केला. ही माहिती पोलिसांना समजताच आरोपीने पळ काढला. फिर्यादीच्या म्हणण्यावरुन सदर आरोपी राकेश शिर्के याच्या विरुद्ध 376, 378(2)(आय)(आय), 376 (3), 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली.
अधिक तपास पेण उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे करीत आहेत.

दरम्यान, रोहा तालुक्यात यापुर्वी तांबडी सामुहिक बलात्कार, पेण येथील अल्पवयीन मुलीवर अष्टमी परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणे घडली आहेत. त्यांचा तपास अद्याप सुरु आहे. या घटना ताज्या असतानाच रविवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याने माणुसकी व कायदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न रोहा तालुक्यात निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *