रोहेकरांची रेल्वे फाटक बंद डोकेदुखी संपणार,डिसेंबर महिन्यात उड्डाणपूल काम सुरु, खा. तटकरेंनी घेतला आढावा

Share Now

1,736 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरात प्रवेश करताना अष्टमी व पडम येथील बंद रेल्वे फाटक ही नागरिकांची डोकेदुखी होती. रेल्वे मार्ग दुपदरीकरण झाल्यानंतर वाढलेल्या रेल्वे गाड्या यामुळे फाटक बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होते.मात्र आता खा. सुनिल तटकरेंच्या रुपाने रोहेकरांची ही समस्या दिल्ली दरबारी वारंवार मांडली जात असल्याने त्याची दखल घेत डिसेंबर महिन्यापासून रोहा नागोठणे राज्यमार्गावर उड्डाणपूल उभारणीस सुरुवात होणार आहे.महा रेल ,सार्वजनिक बांधकाम खाते या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांन सोबत खा. तटकरे यांनी अष्टमी व पडम येथील रेल्वे फाटक परिसरात पाहणी दौरा केला. यावेळी अष्टमी व पडम येथे होणाऱ्या कामाची त्यांनी अधिकारी वर्गाकडून प्रत्यक्ष मंजूर नकाशे समोर ठेवत माहिती घेतली. त्यावेळी डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे वर्षभरात हे काम पूर्ण होत फाटक बंद ही समस्त रोहेतालुक्यातील जनतेची डोकेदुखी आता कायमस्वरूपी सुटणार असे आशादायक चित्र दिसत आहे.

शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता खा. सुनिल तटकरे यांनी केलेल्या या पाहणी वेळी आ.अनिकेत तटकरे, महा रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंता पी. के. जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड कार्यकारी अभियंता बामणे ,उपविभागीय अभियंता देवकाते, यांसह नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,विनोद पाशीलकर,नवनीत डोलकर ,उत्तम नाईक, संदीप चोरगे, सूर्यकांत वाघमारे, नगरसेवक महेश कोलाटकर,महेंद्र गुजर,अहमद दर्जी,अनंतराव देशमुख,आप्पा देशमुख,लक्ष्मण महाले,रवींद्र चाळके, मयूर खैरे,घनश्याम कराळे,आदी उपस्थित होते.

रोहा नागोठणे राज्यमार्गावर अष्टमी व पडम येथील रेल्वे फाटक ही नागरिकांना गेले कित्येक वर्षे भेडसावणारी समस्या होती. दिवसेंदिवस रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढत असल्यामुळे वारंवार हे फाटक बंद होत असल्याने नागरिकांचा खोळंबा होत होता. अतिगंभीर रुग्ण, कामगार, विद्यार्थी, नोकरदार यांना याचा सर्वाधीक मनस्ताप सहन करावा लागत होता. या ठिकाणी उड्डाणपूल वा पर्यायी मार्ग करावा अशी कित्येक वर्षे सर्व स्तरातून मागणी केली जात होती.रायगडचे खासदार म्हणून सुनिल तटकरे निवडून येत लोकसभेवर गेल्यावर आपण लवकरच ही समस्या मार्गी लावणार असे आश्वासन दिले होते.लोकसभेत वारंवार त्यांना हा प्रश्न उपस्थित करत रेल्वे प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत पाठपुरावा सुरु केला.त्यानंतर आता राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर येताचा महा रेल व सार्वजनिक बांधकाम खात्याने सयुक्त रीतीने ही समस्या मार्गी लागणाऱ्या प्रकल्पाला मान्यता दिली.

अष्टमी येथे उड्डाणपूल तर पडम येथे भुयारी मार्गाच्या कामाला केंद्र व राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रत्यक्ष काम कसे होणार हे जाणून घेण्यासाठी खा. तटकरे यांनी प्रशासकीय अधिकारी, स्थानिक नागरिकांचे सोबत पाहणी केली.यामध्ये अष्टमी येथे उड्डाणपूल होत असताना नगरपरिषद हद्दीतील नवीन वसाहत, पिंगळसई पंचक्रोशीतील गावाना रोहा शहरात येण्यासाठी सोयीस्कर मार्ग असल्याची खात्री अधिकारी वर्गाकडून घेतली. पडम येथे भुयारी मार्ग होत असताना येथील कुंडलिका खाडी व लगतचे डोंगराळ भाग यामुळे पावसाळ्यात भुयारी मार्ग गैरसोयीचा ठरेल याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देत याठीकाणीही उड्डाणपूल प्रस्ताव करा निधी आणण्यासाठी मी सक्षम आहे. शंभर वर्षांच्या विकासाच्या दृष्टीने आताच योग्य नियोजन करत हे काम करा अश्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यासोबतच यातील अष्टमी येथील पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन डिसेंबर महिन्यात केंद्रातील व राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याचा प्रयत्न करत २०२३ पर्यंत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्धार खा. सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *