कोकणकन्या शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांना महाशिक्षक पुरस्कार प्रदान, हा तर रोह्याचा सन्मान, सार्वत्रिक भावना

Share Now

740 Views

रोहा (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मूळच्या कोलाड रोहा येथील शिक्षिका, कोकणकन्या शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाशिक्षक पुरस्काराने गौरविले. पालघर जिल्हा परिषदेच्या आगवन शिशुपाडा शाळेत त्या शिक्षणाचे ज्ञानसेवा करीत आहेत. एस आर दळवी फाउंडेशन (आय) नवी मुंबई यांच्या वतीने कोरोना काळात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लॉकडाउन काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचे अध्यापन निरंतर चालु ठेवले आणि सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘स्मार्ट पाटी’ ह्या नवोपक्रमाला राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. याच कार्याची दखल घेत शिक्षिका वरूणाक्षी आंद्रे यांचे गौरव करण्यात आले.

मुंबई येथील नरिमन पॉइंट येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, अत्याधुनिक टॅब असे पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी व्यासपीठावर जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रंजीतसिंह दिसले, मुंबई विद्यापीठाचे संचालक राधाकृष्ण पिल्लाई, मनशक्ती केंद्राचे ट्रस्टी प्रमोद शिंदे, स्क्वेअर पांडा इंकचे अध्यक्ष आशिष झालानी व मान्यवर उपस्थित होते. वरूणाक्षी आंद्रे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पालघर जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले. दरम्यान, वरूणाक्षी आंद्रे यांना मिळालेल्या मानाचा पुरस्कार हा कोलाड, रोहा गावाचा यथोचित सन्मान आहे अशी सार्वत्रिक भावना व्यक्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *