आपल्याला उद्दिष्ठ ठरवायची असतील तर कौशल्य मिळविता यायला हवित – प्रा.अतुल साळुंखे

Share Now

314 Views

धाटाव (शशिकांत मोरे) महाराष्ट्राच्या इतिहासात तीन प्रकारचे किल्ले आपण पाहिलेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले डोंगरावरचा किल्ला ज्याला गिरिदुर्ग म्हटले जाते असे किल्ले बांधले,त्यानंतर सागरावरची ताकद ओळखली म्हणून जलदुर्ग किल्ले बांधल्या नंतर भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली.जसे जसे शत्रूचे आक्रमण होत गेले तस तसे किल्यांच्या निर्मितीत सुद्धा अमुलाग्र बदल केला गेला म्हणून प्रत्येक किल्ला हा एका धर्तीचा नाही.जेंव्हा आपण शहराच्या रचनेचा विचार करतो तो विचार जसा आपण मोहेंजोदडो मध्ये पहिला त्या पेक्षा चांगली कलापट्टी कुठे पहावयास मिळाली असेल तर ती फक्त गडकील्यांमधेच.म्हणून जर का तुम्हाला उद्दिष्ट ठरवायची असतील तर आधी कोणत्या प्रकारच्या कौश्यल्यांची गरज आहे ती कौश्यल्य मिळविता यायला हवीत असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल साळुंखे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

रोहा तालुका सकल मराठा समाज आयोजित किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते व्यासपीठावर बोलत होते.रोह्यातील शासकीय विश्रागृहात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष प्रदीप देशमुख,उपाध्यक्ष नितीन परब, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.विश्वनाथ देशमुख,श्री कोंडे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष लीलाधर देशमुख,सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव,अनंत देशमुख, प्रशांत देशमुख, सुर्वे मामा, बबन देशमुख, सूर्यकांत मोरे, सुहास येरूनकर, दिलीप देशमुख,मारुती गोळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात साळुंखे सर पुढे म्हणाले की,गड-किल्ल्यांचे ‘स्थापत्य’ कसे होते व एकेकाळी वैभव पाहिलेल्या; परंतु आज जीर्णावस्थेत पडून असलेला ऐतिहासिक वास्तूवारसा जपण्यासाठी नेमकी उपाययोजना समजून घ्यायला हवी.

गड किल्यांबाबत मुलांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी व किल्ल्यांचे जतन व्हावे याच उद्दात हेतूने दरवर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.मात्र यावर्षी रोहा तालुक्यातील विविध खेडो पाड्यातील मुलं,मुलींनी यामधे सक्रिय सहभाग घेतल्याचे पहावयास मिळाला.यामधे प्रथम क्रमांक गीता होम सोसायटी(किल्ला पद्मदुर्ग)
द्वितीय क्रमांक जय गिरोबा अंधारआळी(रामसेज),तृतीय क्रमांक शिव प्रतिष्ठिन अष्टमी तर उत्तेजनार्थ राजदीप जाधव(गोवे),जय हनुमान मित्र मंडळ,(राजेवाडी),जय भवानी ग्रुप-चनेरा,युवा प्रतिष्ठान,घोसाळे,उत्कृष्ट संकल्पना म्हणून कौस्तुभ उदय कोंडे,भक्ती सागर सोसायटी यांना पारितोषिके देण्यात आली. तर उत्कृष्ट प्रतिकृती देवांश आरेकर,साहिल खरीवले यांना तर उत्कृष्ट वक्तृत्व सीताई वाँरियार्स व श्रुती दळवी यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात कोरोना काळात उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल रोहा तहसिलदार प्रशासन,रोहा पोलीस प्रशासन,उपजिल्हा आरोग्य विभाग त्याचप्रमाणे पत्रकारांची संघटना रोहा प्रेस क्लब यांच्यासह राजेश कापरे,आदित्य कोंडाळकर यांनाही सन्मानित करण्यात आले. किल्ले निरीक्षण आणि कार्यक्रमाचे उत्तम नियोजन समीर दळवी,सचिन दळवी,अरुण साळुंखे यांसह सर्व सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *