महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूसंपादनाचा विरुद्ध अजब फतवा, माणगाव तालुक्यातील शेतक-यांचा माणगांव प्रांत कार्यालयावर मोर्चा

Share Now

57 Views

वावेदिवाळी (गौतम जाधव) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादन माणगाव व रोहा तालुक्यात चालू आहे. साधारण २०१४ पासुन येथिल टप्पा क्रमांक १ च्या भूसंपादनाचे काम चालू आहे. ७००० ते ८००० एकरचे संपादन शेतकऱ्यानी संमती पत्र देऊन कोणताही
अडथळा न आणता करून दिले.तसेच वरील सर्व शेत जमिनीच्या ७/१२ वर एमआयडीसी ने भूसंपादनाचे शिक्के २०१२ ते २०१४ दरम्यान मारले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी त्यांच्या अडीअडचणी प्रसंगी विकता आल्या नाहीत. तसेच एवढे मोठे भूसंपादन करताना ७/१२ तील तफावत,जमिन मोजणी, भाऊ बंधकी, वारसपंचनामे,बहिणीचा हिस्सा, वैयक्तिक कर्ज, कोर्टकचेरी प्रकरणे मिटवून आम्ही सर्वांनी संमती पत्र दिले.तसेच प्रशासनाच्या चुकांमुळे अथवा रेकॉर्ड मधील फरकांमुळे माणगाव येथिल भूसंपादन अधिकाऱ्यांनी चूक दुरुस्ती चे प्रस्ताव सुमारे ७/८ महिन्यांपूर्वी एमआयडीसी विभागात पाठवले आहेत त्याचे अजून कोणतेही उत्तर आले नाही.

याकरीता माणगांव तालुक्यातील इंदापुर व निजामपुर या विभागातील शेतकऱ्यांनी दि.१८ नोव्हेंबर रोजी माणगांव येथील उप विभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदना मध्ये शेतकऱ्यांनी माणगांव प्रांताधिकारी यांच्याजवळ बोलताना सांगितले की, आमच्या जमिनीचा मोबदला लवकच द्या नाहीतर ७/१२ वरील शिक्के हटवा. अशी मागणी केलो.यावेळी प्रांतअधिकारी यानी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की शासनाने शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय जाहीर केला तर आम्ही आमच्या कार्यालया कडून भुसंपादित शेतकऱ्यांना मोबदला देऊ यावेळी शेतकरी राजेश कदम, नितिन शिर्के, मंगेश वालुगडे, संजय वालुगडे, लहु लुस्टे, सदिप कदम, गोपाळ कदम, सुरज पवार, संतोष रसाळ, अविनाश जाधव, प्रभाकर कदम शांताराम कजबजे आदी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची मनमानी कारभाराची हद्दच झाली आहे. आम्ही साधारण ६ महिन्या पूर्वी संमतीपत्र दिले असुन सुद्धा आम्हाला भूसंपदानाचा मोबदला मिळाला नाही. तसेच आमच्या गावातील इतर साधारण ६०% शेतकरी बांधवाना यापूर्वीच मोबदला मिळाला आहे. परंतु आता भूसंपादनाचा मोबदला एमआयडीसी च्या मनमानी कारभारामुळे आम्हाला मिळाला नाही.आज पर्यंत भूसंपादन अधिकारी भुवन, जामगाव, पाथरशेत, रातवड, घोटवळ, नीळज, पाणसई, कालवण, दाखणे, भाले, वावेदिवाळी,कुंभार्ते, बोडशेत कांदळगाव, जावटे, कोशिबळे तर्फे निजामपूर या गावातील शेतकऱ्यांना भूसंपादन अधिकारी त्यांच्या संमतीपत्रानुसार मोबदला देत होते व आज वरील गावातील उरलेल्या संमती पत्र दिलेल्या शेतकऱ्यांनी भूसंपादन कार्यालयात चौकशी केली असता आता फक्त कुंभार्ते, बोंडशेत कांदळगाव, जावटे, कोशिबळे तर्फे निजामपूर या गावातील शेतकऱ्यांनाच भूसंपादन मोबदला मिळेल व बाकिच्या उरलेल्या गावातील संमती पत्र दिलेल्या शेतकऱ्यांना एमआयडीसीचे पत्र व एमआयडीसीकडुन मोबदल्याची रक्कम आल्या वरच मिळेल असे शासनाकडून कळले आहे. असा मनमानी कारभार एमआयडीसीचे अधिकारी कसा करू शकतात ? आम्हाला आमच्या जमिनीचा संमतीपत्र देउन सुद्धा जर वरील सहा गावाना सोबत मोबदला मिळाला नाही तर आम्ही माणगांव प्रांत कार्यालया समोर उपोषण सुरू करणार असून वेळ पडल्यास आत्मदहन देखील करू परंतु त्या सहागावातील कोणत्याही शेतकऱ्यास मोबदला घेउन देणार नाही. तसेच रायगडच्या पालकमंत्री व उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे या भागातील असताना  देखील मनमानी कारभार एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकारी कसा करू शकतात आसा प्रश्न देखील  शेतकरी बांधवाना पडला आहे. तरी एमआयडीसी व त्यांच्या भूसंपादन अधिका-यांनी आम्ही दिलेल्या सर्व संमतीपत्रा नुसार ताबडतोब भूसंपदानाचा मोबदला दयावा.नाहीत उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *