भलत्याच श्रेयाच्या लढाईत ढिशूम् ढिशूम्, नगरसेवकांचा तमाशा सर्वत्र ‘व्हायरल’, कानसीलाचा आवाज थेट हॉस्पिटलमध्ये

Share Now

1,752 Views

रोहा (राजेंद्र जाधव) कार्यकर्ते आणि नेते कोणत्या थरापर्यंत पोहचू शकतात याची प्रचिती नुकतीच समस्त नागरिकांना आली. भलत्याच श्रेयाच्या लढाईत दोन नगरसेवकांत अक्षरशः ढिशूम् ढिशूम् झाले. उलटसुलट चर्चेतील पूरग्रस्तांची शिल्लक राहिलेली अमाप मदत वार्डातील सामान्यांना वाटा असे फर्मान आले. मग काय ? ताटातले वाटीत, तुझ्या बापाचे नाही, देणाऱ्याच्या बापाचेही नाही असा जोरकस काढत शहरातील दोन जानेमाने नगरसेवक आमनेसामने आले. त्यातून बाचाबाचीचे पर्यावसन ढिशूम् ढिशूम् हाणामारीत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हाणामारीत एका नगरसेवकाच्या कानाखाली बसलेला आवाज उपचारार्थ थेट हॉस्पिटलपर्यंत गेल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रकारानंतर पूरग्रस्तांच्या मदतीवर अक्षरश: डल्ला मारत असल्याची खमंग चर्चाही यानिमित्त रंगली. मदत वाटण्याच्या प्रकारातून प्रचंड वाद झाला. अखेर त्या साऱ्यांचेच कर्तुत्व नियतीने लोकांसमोर आणले. दोन नगरसेवकांचा तमाशा हा हा हा म्हणता सर्वत्र व्हायरल झाला. मदत पूरग्रस्तांची ना याच्या बापाची ना त्यांच्या बापाची, असा प्रत्येकजण नाक्यानाक्यावर बोलत आहे. दरम्यान, दोन नगरसेवकांमधील ढिशूम् ढिशूमचे पर्यावसन पुढे नेमके कशात होते, नेतेगण काय समझोता करतात ? असे खुद्द त्यांच्याच कार्यकर्त्यांतून बोलले जाते. तर सर्वच विरोधक फजिती बघण्यासाठी सज्ज झाल्याची मजेशीर बाबही समोर आली आहे.

महाड यांसह अनेक गावांत पुराने थैमान घातले होते. अख्खा संसार मोडून पडला. त्या कुटुंबाला हातभर लावण्यासाठी शासन, प्रशासन यांच्यापेक्षा शेकडो दानत लोकांनी हिरारीने भाग घेतला. मुंबई, पुणे, शहर, जिल्ह्यांतील नागरिकांनी सर्वच प्रकारची मदत पूरग्रस्तांना पाठविली. दररोज शेकडो मदतीचे टेम्पो, गाड्या महाड व गावागावांत आल्या. अशात श्रेयासाठी माहिर असलेल्या नेत्यांनी प्रत्येक रस्त्यांत अनेकांचे टेम्पो अडविले. अडथळे सांगत आम्ही मदत लोकांपर्यंत पोहचवू. मग काय ? मदत ताब्यात घेत आणि तिच मदत प्रतिष्ठानच्यावतीने वाटप करण्यात आली. त्यावर संबंध जिल्ह्यात मोठी चर्चा झाली. नेत्यांच्या मानसिकतेवर खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाडमध्ये येऊन तीव्र नापसंती व्यक्त केली होती. पूरग्रस्तांची मदत मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आली. त्यातील साड्या, कपडे व अन्य मदत दिवाळी भेट म्हणत अनेक ग्रामपंचायत हद्दीत वाटण्यात आली. पण ही मदत प्रतिष्ठानची आहे, हे भासविण्यात आले. मात्र ज्यांना माहीत झाले, त्यांनी सर्वत्र दवंडी पिटवली. त्यातील उरलेल्या भांडी व अन्य साहित्य शहरातील सर्वच वार्डात भेट म्हणून वाटावे, नीट वाटणी करून घ्यावी, असा कार्यक्रम राबविण्याचे ठरले. बेसुमाल मदत सुरू असताना तवा संपले, मग आम्हाला ताट जादा द्या असं बोलल्यानंतर तुझ्या बापाचे आहे का, त्यावर तुझ्यातरी बापाचे आहे का ? अशी दोन नगरसेवकांत हमरातुमरी झाली. त्यात एकाच्या कानशीलात बसल्याचा प्रकार घडला आणि सर्व तमाशा हा हा म्हणता व्हायरल झाला आहे.

मदत पूरग्रस्तांची, कोणाच्याच ना बापाची हे खुद्द त्यांच्यातीलच एका सहकार्याने गुपचूप दूरध्वनी करून पत्रकारांना सांगितले. नेमका प्रकार काय घडला ? हा वृत्तांत चवीने सांगण्यात आला. पूरग्रस्तांची उरलेली मदत ईतर सामान्यांना मिळावी, लोकांचे पुण्य मिळावे, अशी नेत्यांची उदात्त भावना होती. त्यात गैर काही नाही, असेही या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. परंतू ताट, तवा म्हणत नगरसेवकच एकमेकांवर तुटून पडावे हे दुर्दैव आहे, अशी चर्चा संबंध तालुक्यात तुफान रंगली. ज्याच्या कानशिलात बसली, त्याला हॉस्पिटल गाठावे लागले. कपडेही एकमेकांचे फाडले, अशी अप्रत्यक्ष बोलकी प्रतिक्रीया विरोधक नेत्याने दिली. हा सगळाच प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सामान्यांना वस्तूरुपात मदत मिळावी, अशा प्रांजळ सेवाभावी भावनेला दोन नगरसेवकांच्या हमरातुमरीने अक्षरश: तडा गेला आणि राजा तथा कारभारी हा संकेत सर्वदूर गेला. आतातरी नेतेगण वर्ष दोन वर्षापासून बिघडलेल्या शिस्तीवर कानात गरम कानमंत्र देतात का ? अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनीच व्यक्त केली. दरम्यान, निवडणुका जवळ आल्या असताना करायला गेले सेवा, चर्चेत आला पडद्यामागील मेवा, दुसरीकडे पूरग्रस्तांची मदत भलत्याच ठिकाणी वाटणे कितपत योग्य ? असा सवाल सृजान नागरिकांतून अधोरेखित झाला, तर त्या दोन नगरसेवकांत ढिशूम ढिशूम, अशा व्हायरल झालेल्या तमाशाने अनेकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *