पुढच्या वर्षी देशाच्या स्वच्छता सर्वेक्षणात रोहा नगरपरीषद उतरुन नंबर येण्याचा बहुमान घेऊ : खा.सुनिल तटकरे

Share Now

417 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा अष्टमी नगरपरीषदेत पायाभूत सुविधा उपलब्ध असून आपण स्वच्छता अभियानात उतरलो नाही हे शल्य माझ्या मनामध्ये राहिले आहे. शुक्रवारी खालापुर नगरपंचायतमध्ये गेलो होतो. अश्या छोट्या नगरपरीषदा स्वच्छता अभियानात उतरतात. मात्र आपल्या नगरपरीषदेत पायाभूत सुविधा असून आपण स्वच्छता अभियानात उतरलो नव्हतो. मात्र पुढच्या वर्षी देशाच्या स्वच्छता सर्वेक्षणात रोहा नगरपरीषद उतरुन नंबर येण्याचा बहुमान मिळवू असा संकल्प खा.सुनिल तटकरे यांनी केला. रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीतील मच्छीमार्केट लोकार्पंन सोहळा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. यापुढे ते म्हणाले कि, गेल्या वीस वर्षामध्ये रोहेकर नागरिकांना जो विश्वास आमच्यावर टाकला त्यामुळेच रोहेकरांना पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करुन देऊ शकलो. पाणी, रस्ते, व्यावसायिकांसाठी जागेची उपलब्धी करुन दिल्याने मच्छी विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. माझ्या वीस वर्षाच्या आमदारकिच्या काळात रोह्यात विकास कामे करण्यात आली.आता पालकमंत्री अदिती तटकरे व विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या आमदार निधीतून आता मोठ्या वास्तू उभारल्या जात असल्याने रोजगार आणि विकास यांचा समतोल आता साधला जात आहे असे वाटते. त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी दिपोस्तव साजरा केला तो रोहेकरांनी अनुभवला.

यावेळी पालकमंत्री ना.अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक महेश कोलाटकर, राजू जैन, युवा कार्यकर्ते रविंद्र चाळके, सचिन चाळके, विभाग अध्यक्ष नंदू म्हात्रे, माजी सभापती लक्ष्मण महाले, राजश्री पोकळे, नगरसेवक महेंद्र गुजर, समीर सकपाळ, सुभाष राजे, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांसह मच्छीविक्रेते व रोहेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

रोहा अष्टमी नगरीत चिकन-मटण मार्केट, भाजी मार्केट व आता भव्य मच्छी मार्केट बांधल्याने व्यावसायिकांची समस्या सुटली आहे. सुक्या मासळीसाठी सुद्धा जागा उपलब्ध झाल्याने आता सर्व व्यवसायिकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारच्या आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची कल्पना तयार केली आहे. असे पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी सांगितले. खवय्यांना चिखलात पाय टाकून मच्छी खरेदी यायला लागत होते. मात्र आता मच्छीमार्केटची भव्य इमारत उभी राहिल्याने खवय्यांची समस्या मार्गी लागली आहे. मच्छीमार्केट शेजारी भाजी मार्केट असल्याने खरेदी करणा-या रोहेकर नागरिकांची कायमची समस्या सुटणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करु नये व खरेदीला येताना कापडी पिशवी घेऊन येणे तीतकेच महत्वाचे असल्याचे आ.अनिकेत तटकरे म्हणाले. तर मच्छी मार्केट हे व्यावसायिकांचे उत्पन्नचे साधन आहे. या व्यवसायावर मच्छी विक्रेत्यांचे घर संसार चालत आहे. त्यामुळे मच्छी मार्केट या वास्तुची स्वच्छता व्यावसायीकांनी करणे गरजेचे आहे. याशिवाय प्रत्येक व्यवसायिकांनी भव्य वास्तुची स्वच्छता केल्यास या वास्तुचे जतन होईल असे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *