गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नारायण गावंड तर उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची सर्वानुमते निवड

Share Now

136 Views

रोहा (शशिकांत मोरे) गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या निवडीत अध्यक्षपदी नारायण गजानन गावंड यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश नकुल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सन २०२१-२२ ते २०२६ -२७ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी १३ जणांच्या संचालक मंडळाची नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.या सभेत अध्यक्षपदी नारायण गजानन गावंड तर उपाध्यक्षपदी प्रकाश नकुल पाटील यांची निवड झाल्याचे ठाणे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनावणे यांनी घोषित केले.सर्वसाधारण मतदार संघातून रणजित पाटील,नारायण गावंड,दशरथ घरत, दशरथ पाटील, नामदेव पाटील, कय्युम चेऊलकर, प्रकाश पाटील, पाम पाटील, नवनाथ पाटील, केसरीनाथ घरत यांची तर महिला मतदार संघातून राजश्री पाटील, शशिकला पाटील व अनुसुचीत जाती/जमाती मतदार संघातून डॉ.संजय पोपेरे यांची संचालकपदी निवड झाली आहे.

या निवडनुकीसाठी अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र स्वइच्छेने अनेकांनी माघार घेतल्याने निवडून आलेल्यांचा मार्ग सुकर झाल्याने बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी सभासदांसह हितचिंतक सर्वांचेच आभार मानले.नव्याने निवडून दिलेल्या संचालक मंडळावर टाकलेला विश्वास सार्थ करून बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवला जाईल असे नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून आश्वासन देण्यात आले. नारायण गावंड यांच्या अध्यक्षपदी निवडीचे चंद्रहास गावंड,विजयराव मोरे,सौ अहिल्या दळवी,अनिल गांवड,रवी गावंड,अशोकराव मोरे,अविनाश म्हात्रे, चंदन गावंड व देवधर गावंड त्यांच्या समवेत सर्व सहकाऱ्यांसह असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *