‘ पांडू ‘ चित्रपटामध्ये झळकणार रोहेकर हरी ठमके

Share Now

2,757 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) झी स्टुडिओज या मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या चित्रपट निर्मिती संस्थेचा ‘पांडू’ हा नवाकोरा सिनेमा येत्या ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.आजचे आघाडीचे लेखक व दिग्दर्शक विजू माने यांच्या या चित्रपटात भाऊ कदम कुशल बद्रीके या दोन सुप्रसिद्ध अष्टपैलू हास्यविरांसह नटरंग फेम अप्सरा सोनाली कुलकर्णी, मुळशी पॅटर्न प्रवीण तरडे, जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांनी अभिनय केला आहे.आजचे आघाडीचे संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत देत त्याची गाणीही त्यांनी लिहिली आहेत व सोबतच गायिका संपदा माने व वैशाली सामंत यांनी गाणी गायली आहेत जी आज सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.हेमांगी कवी,प्राजक्ता माळी,उदय सबनीस,आनंद इंगळे,संदिप जुवाटकर, नयन जाधव, योगेश केळकर व मराठी चित्रपटात पहिल्यांदाच शहाबाज खान अशा खूप सार्‍या विनोदी कलाकारांचा समावेश असलेल्या अशा या झी स्टूडिओज प्रस्तूत विजू माने लेखक व दिग्दर्शित पांडू या चित्रपटात रोहा तालुक्यातील भिसे पोफळघर येथे लहानाचे मोठे झालेले व मुळचे रहिवासी असलेले हरी भिकू ठमके या सर्व नावाजलेल्या कलाकारांच्या बरोबर अभिनय करीत झळकणार आहेत.हरी ठमके यांनी याआधी विविध नाटके, मालिका, चित्रपट यामध्ये छोटेखानी कामे करत आपला अभिनय प्रवास सुरु केला होता. आता पांडू चित्रपटामध्ये त्यांना भूमिका मिळाली असून या चित्रपटात भुमिका साकारुन त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. झी स्टूडिओज सारख्या नामांकित कंपनी मध्ये हरी ठमके यांना काम करण्याची संधी मिळाली ही रोहे तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

हरी भिकू ठमके यांचे शिक्षण रोहा तालुक्य‍ातील को.ए.सो मेढा हायस्कूल येथे झाले असून ते आपल्या नोकरी व्यवसायानिमित्ताने ठाणे येथे वास्तव्यास असतात.कुठलेही अभिनय शिबीर किंवा अभिनयाचे धडे न घेता येईल त्या अनुभवातून आपल्या अभिनयाची सुरुवात त्यांनी यदाकदाचित, वंदेमातरम् ,भिम बाणा, राम नगरी, जोधा अकबर, आता आपणच,छू मंतर या नाटकांमधून छोट्यामोठ्या भूमिका करत केली. यानंतर छोट्या पडद्यावरील मन उधाण वाऱ्याचे,कुलवधू, जन्म गाठ, एक तास भुताचा, अस्मिता या मालिकां मधून अभिनय केला. विजू माने दिग्दर्शित सचिन पिळगांवकर अभिनीत शर्यत यांसह मुंगळा, साहेब, सुत्रधार, धो धो पावसातील वनडे मॅच,सहसासूचा राजेश देशपांडे दिग्दर्शित धुडगूस आदि चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर आपला अभिनय साकारण्याची संधी मिळवली.तर धो धो पावसातील वनडे मॅच,वास्तू रहस्य,चंद्रकला,सत्या आदी चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शनाचे काम केले आहे.यानंतर प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित हिंदी हॉरर व्हेबसीरिज मध्ये देखिल हरी ठमके यांना पाहता येणार आहे.

आपल्या आजवरच्या अभिनय कलेस लेखक दिग्दर्शक विजू माने यांनी केलेले मार्गदर्शन व वेळोवेळी त्यांनी अभिनय करण्याची संधी दिल्यानेच आज झी स्टूडिओजच्या पांडू सारख्या मोठ्या चित्रपटात दिग्गजांबरोबर झळकण्याची संधी मिळत असल्याचे हरी ठमके यांनी आवर्जून सांगितले आहे व याच श्रेय ते पांडू सिनेमाचे लेखक व दिग्दर्शक विजू माने यांना देतात.त्यासोबतच माझे कुटुंबीय व भिसे पोफळघर, ठाणे येथील मित्रपरिवार यांच्या भक्कम पाठिंब्याने हा अभिनय प्रवास यशस्वी होत असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. चित्रपट,मालिका व नाटकांमधील अभिनयाबरोबरच हरि ठमके यांनी एड्स जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात पथनाटय सुद्धा केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *