जागतिक एड्स दिनानिमित्त किहीम आदिवासी वाडी येथे जनजागृती व मोफत आरोग्य शिबीर

Share Now

122 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) जागतिक एड्स दिनानिमित्तअलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, रुरल यंग फाऊंडेशन, तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १/१२/२०२१ रोजी स. ११ ते दु. २ या वेळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने व जागतिक एड्स दिनानिमित्त किहीम आदिवासी वाडी येथे मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी एड्स बद्दल जनजागृती तसेच १३० लोकांची व लहान बालकांची सामान्य आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. सामाजिक संस्थांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विशेष कौतुक केले. यावेळी रायगड जिल्हा परिषद कडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित घासे, जिल्हा सामान्य रुग्णालय कडून डॉ. श्वेता कार्वेकर, डॉ. राजाराम हुलवान, स्वागता जैन, जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय माने व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होते. तसेच आयोजक व नियोजक लायन्स क्लब ऑफ श्रीबागच्या संस्थापिका व अध्यक्षा ॲड. डॉ. निहा अनिस राऊत, अध्यक्ष बी ए. चौगुले, ॲड. कला पाटील, वनगे सर, माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर कडून सुधाकर निषाद व टीम, नेहरू युवा केंद्र अलिबाग अध्यक्ष व समाजकार्य कर्ता सुशील साईकर, राजश्री नाईक, मंगला पवार, तेजस्विनी फाउंडेशनच्या संस्थापिका व समाजकार्यकर्ती जिविता पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सुपरवायझर, आशा सेविका, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका, इतर सामाजिक स्वयंसेवक उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्य बद्दल व निरोगी कसे रहायचे याबद्दल माहिती दिली तर श्री संजय माने यांनी एडस दिनानिमित्त जनजागृतीपर सर्वांना समजेल अशा भाषेत माहिती दिली. सुशील साईकर यांनी स्वच्छतेबद्दल निर्व्यसनी राहण्याबद्दल सांगितले, ॲड. डॉ. निहा राऊत यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व सर्व मुले आजारी पडणार नाहीत अशी ग्वाही घेतली. जिविता पाटिल यांनी एड्स दिना बद्दल शपथ सर्वांकडून वदवून घेतली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरित्या करीत सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *