केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचा वेगळा खाता सूरु केल्याने सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील ; खा.  विनय सहस्रबुद्धे

Share Now

343 Views

धावीर रोड (अंजूम शेटे) केंद्र सरकारने सहकार क्षेत्राची बिकट परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमीत शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सहकार क्षेत्राचा एक वेगळा खाता सूरु केला आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील असे प्रतिपादन खा. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सहकार व सामाजिक क्षेत्रात नाव लौकीक असलेल्या कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रोहाच्या नुतन वास्तूचे उदघाटन खा. विनय सहस्रबुद्धे, खा. सुनिल तटकरे  यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी खा. विनय सहस्रबुद्धे बोलत होते. सहकार क्षेत्राबाबत केंद्र सरकारच्या धोरणाविषयी सविस्तर माहिती देत खा. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग अतिशय कौतुकास्पद आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने 28 वर्षे वेगवान प्रगती केली आहे असे सांगत सर्वांचे त्यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

यावेळी खा. सुनील तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, रोहा सारखे छोट्या गावात कुंडलिका पतसंस्थेचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.  रायगड जिल्ह्यात शहरात येणाऱ्या नवीन योजना विषयी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की लवकरच जिल्ह्यात सर्व सोयी सुविधायुक्त 100 खाटांचे व आपल्या गावात 50 खाटांचे महीलांसाठी सुसज्ज रुग्णालय आणण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबतचे थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस केली आहे. पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे थोडा उशीर झाला आहे, परंतु केवळ दहा पंधरा दिवसात हे मंजूर होऊन नीधी ही नक्कीच उपलब्ध होईल, हे दोन्ही रुग्णालय झाल्यानंतर येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई व इतरत्र ठिकाणी जावे लागणार नाही असे खा. तटकरे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात खा.विनय  सहस्रबुद्धे, खा. सुनिल तटकरे, कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष विवेक वत्सराज, सहायक निबंधक तुषार लाटणे, सुमुख कुलकर्णी, चार्टर्ड ऐकाउंटेंट सतीश मेडी, कमल नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे संचालक मंडळाचे अनिल आठवले, प्रल्हाद भाटे, संजीव कवितके, अशोक जोशी, पुरूषोत्तम कुंटे, प्रमोद काळवीट, माधव दाते, विवेक रावकर, जयश्री भांड, धनश्री बापट, रमेश वाघमारे, अविनाश दाते, संस्थेचे व्यवस्थापक प्रमोद फुलारे यांसह अन्य मान्यवर व रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्ताविक भाषणात संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले की,  आमची संस्था वनवासी कल्याण आश्रम, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्ञान गंगा बहूविकलांग संस्था, श्री राम जन्मभूमी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड 19) व इतर सामाजिक क्षेत्रात नेहमीच खारीचा वाटा उचलत असते असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंडलिका संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *