पहूर (रोहा) ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत शिवसेना उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला धक्का

Share Now

428 Views

कोलाड (वार्ताहर) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका घेण्यात आल्या. यापैकी पहूर ( ता. रोहा ) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर यांचे कोरानामुले निधन झाल्याने एका जागेसाठी 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक मतदान झाले. या पोटनिवडणुकीसाठी वार्ड क्र. 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निता बबन उमासरे तर शिवसेनेच्या ऐश्वर्या यशवंत शिंदे हे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी रिंगणात उभे होते. मात्र या अटीतटीच्या लढतीचा आज 22 डिसेंबर रोजी निकाल हाती आला असून यात सौ. ऐश्वर्या शिंदेने बाजी मारत राष्ट्रवादीच्या नीता उमासरे यांचा पराभव केला आहे.

सुतारवाडी विभाग हा प्रामुख्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात पुहुर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेने मुसुंडी मारत नव्या उमेदवार ऐश्वर्या यशवंत शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात यश संपादन केले आहे . नवनिर्वाचित ऐश्वर्या शिंदे यांच्या विजयामुळे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आ. महेंद्र दळवी, राजिप सदस्य किशोर जैन, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपतालुका प्रमुखं चंद्रकांत लोखंडे, शिवसेना विभागप्रमूख कुलदीप सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रमेश धनावडे, श्राजेंद्र यादव, शाखा प्रमुख महेश शिंदे व शिवसैनिक यांनी अथक प्रयत्न करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेना उमेदवार सौ. ऐश्वर्या यशवंत शिंदे यांना बहुमताने निवडून आणले.राष्ट्रवादीला मोठा धक्का देत शिवसेनेची बळकटी वाढली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी या विजयी उमेदवाराचे तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम केले त्या सर्व शिवसैनिकांचे कौतुक करत मतदारांचे जाहीर आभार मानत नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंद करत शुभेच्छा दिल्या आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *