समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांतील उत्साहाच्या लाटा, विकेंडचा जल्लोष, पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक सुखावले

Share Now

255 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) विकेंडच्या दिवशीच नाताळ सण आल्याने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या उत्साहाच्या लाटा उसळत असल्याचे चित्र आज होते. यानिमित्ताने पर्यटकांनी अलिबाग सह आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल होत विकेंडचा जल्लोष केला. तर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असल्याने व्यावसायिक देखील सुखावले आहेत. याचदरम्यान शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू केले असले तरी नियमांच्या चौकटीत राहून विकेंडचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहे. गेले दीड वर्ष कोरोनामुळे घरात कोंडले गेलेले पर्यटक आता विकेंडचा आनंद पुरेपूर लुटत आहेत. तर जिल्ह्यात पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक देखील सुखावले आहेत.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो. मुंबई पुणे हा दोन महानगरांच्या मध्यावर वसलेल्या आणि निसर्ग सौदर्याची लयलूट असलेल्या रेगाद्ची भुरळ पर्यटकांना पडतेच. अशात यावेळी नाताळ व वर्षाच्या शेवटचा दिवस हा विकेंडला आल्यामुळे पर्यटकांसाठी हि मोठी पर्वणी ठरली आहे. नाताळचा जल्लोष करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या अलिबाग व मुरुड भागात पर्यटकांची मांदियाळी आली आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम, अलिबाग, नागाव, बोर्ली, मांडवा, रेवस अशा अनेक भागात पर्यटक दाखल झाले आहेत. तर दिवसभर समुद्रकिनार्यावर पर्यटकांची गर्दी दाटून आल्याचे चित्र आहे. ओमिक्रोंनच्या पार्शवभूमीवर प्रशासन देखील सज्ज आहे. मात्र पर्य्त्कांकडून देखील नियमांची चौकट काटेकोरपणे पाळली जात आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी छोटेमोठे व्यावसायिक देखील सज्ज होते. तर पर्यटक दाखल झाल्याने ते देखील सुखावले असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *