मुरुड उत्पादन शुल्क विभागाची डबल धमाका कारवाई, हजारो रुपयांची गावठी दारु हस्तगत, हातभट्टी माफियांत घबराट

Share Now

259 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) मुरुड राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी निरंतर सुरुच आहे.विभागातील सर्व फार्महाउस, हॉटेल्स, चायनीज सेंटर यांची ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवत संशयित ठिकाणी थेट छापेमारी करण्यात येत असतानाच गावठी हातभट्टी दारु वरही बारीक लक्ष असल्याचे दोन दिवसांतील कारवाई वरुन दिसत आहे.उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, कोकण विभागाचे उप आयुक्त सुनिल चव्हाण यांचे आदेशानुसार खालापूर व रोहा तालुक्यात अवैध पणे वाहतूक होत असलेली गावठी हातभट्टीची दारु हस्तगत करण्यात यश मिळविले.यामध्ये एक दुचाकी व चारचाकी वाहनातून ३० डिसेंबर ची रात्र व ३१ डिसेंबर च्या पहाटे २६० लिटर, ९४१५० रुपये किमतीची गावठी दारु जप्त केली आहे. या कारवाई मुळे विभागातील हातभट्टी माफियांत घबराटीचे वातावरण निर्माण होत उत्पादन शुल्क विभागाचे कारवाईचा अवैध व्यावसायिकांनी धसका घेतला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

रायगड जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षिका कीर्ती शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली व मुरुड विभाग निरिक्षक आनंद पवार व त्यांच्या टिमने ३० डिसेंबर रोजी सापळा रचत प्रथम मौजे आजरुंग, आदिवासीवाडी, ता. खालापूर, जी. रायगड येथे एक्टीवा दुचाकी(नंबर नसलेली) मधून वाहतूक होणारी गावठी दारु पकडली. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पहाटे रोहा चणेरा रस्त्यावर कुंभोशी गावाजवळ पाठलाग करत सकाळी ७ वाजुन ४५ मिनिटांचे दरम्यान MH 04 BQ 5958 ही सेंटरो चारचाकी गाडी पकडली.यादोन्ही वाहनांचे मधून एकूण २६० लिटर एवढी रुपये ९४१५० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु हस्तगत करण्यात यश मिळविले. या छाप्यात मुरुड विभागातील रोहा निरीक्षक संजय वाडेकर, खालापूर दुय्यम निरीक्षक रीतेश खंडारे,सहा. दुय्यम निरीक्षक रजनी नरहरी,जवान निमेश नाईक, गणेश घुगे,महिला जवान अपर्णा पोकळे वर्षा दळवी, वाहनचालक नरेश गायकवाड व पंच या पथकाने सहभाग घेतला. यामध्ये मिळालेला सर्व मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *