नवी मुंबईचे वरीष्ठ पो. निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी अंमली पदार्थ ‘‘एमडी’’ चा व्यापार करणारे आरोपीना अडीच कोटी रूपयांचे अमंली मुद्देमालासह केले जेरबंद, पेझारीजवळ ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरीच आढळून आल्यामुळे खळबळ

Share Now

281 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) एमडी ड्रग्ज तयार करुन विक्री करणार्‍या तीन जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अडिच कोटी किमतीचे 2 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रॅग जप्त करण्यात आले आहे. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारीजवळ ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरीच आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये यांनी ‘‘ नशा मुक्त नवी मुंबई’ या अभियानाचे अनुशंगाने अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सुरेश मेंगडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व विनायक वस्त, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून ड्रग्ज माफियांचा शोध घेण्यात येत होता. कक्ष 3, गुन्हे शाखेकडील अंमलदार नामे पोलीस नाईक संजय फुलकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कक्ष 3 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी कारवाई करुन 31 डिसेंबरच्या नेरे गाव परीसरात अनेक फार्महाऊस.डोंगर. उघड्या मोकळया जागेत पाटर्यांसाठी तरुणांना विकण्यासाठी ड्रग्ज आणणारा इसम कलीम रफिक खामकर वय 39 वर्षे रा. पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड यास ‘एम डी ‘ या अंमली पदार्थासह नेरे गाव येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या तपासातून पुढे त्याचे सहकारी जकी अफरोज पिट्टु वय 33 वर्षे, रा. पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड व सुभाष रघुपती पाटील वय 40 वर्षे ता. पेण, जि. रायगड यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवून नमुद इसमांकडून एकूण 2,50,00,000/- किंमतीचे 2 किलो 500 ग्रॅम ‘‘एम डी ड्रग्ज’’ हा अंमली पदार्थ जप्त केला.

प्रथमच एम डी ड्रग्ज चा कारखाना शोधुन तो नवी मुंबई पोलीसानी सिल करण्यात आला. सदरचा कारखाना पोयनाड, अलिबाग येथे होता. आरोपीविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यांना सदर गुन्हयात दिनांक 31/12/2021 रोजी अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास सुरु आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. 371/2021 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(क), 22(क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कामगिरीकरीता कक्ष-03, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार कोळी, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक जेजूरकर, पोलीस नाईक फुलकर, पोलीस नाईक बोरसे, पोलीस नाईक सोनवलकर, तसेच एएचटीयु चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे, तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस सय्यद, पोलीस उप निरीक्षक विजय शिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार उटगीकर, पोलीस हवालदार पिरजादे, पोलीस हवालदार कांबळे यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे. त्यांच्याकडून मेथॅक्युलॉन पावडर, एक मारुती स्विफ्ट गाडी, अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल, 5 रुपयांच्या 100 नोटा तसेच 2 कोटी 53 लाख 70 हजार 900 रुपये किमतीचे 2 किलो 500 गॅ्रम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच पेझारीजवळ एका फॅक्टरीमध्ये हे ड्रग्ज तयार केेले जात असल्याची माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या संबंधातील आणखी दोघांना पेझारी परिसरातून पोलिसांनी अटक केल्याची चर्चा अलिबागमध्ये रंगली होती. आणखी काही संशयित सापडण्याची शक्यता वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी ‘आमच्या प्रतिनिधी’कडे बोलताना सांगितले. मात्र ज्या दोन नावांची चर्चा अलिबागमध्ये सुरु होती, याबाबत तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईच्या क्राईम विभागाने अंमली पदार्थ बाबत चौकशी साठी ताब्यात घेतलेला सुभाष पाटील हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असून त्याचे शेकापच्या एका नेत्याबरोबर घनिष्ठ संबंध देखिल आहेत अशी चर्चा पेझारी पोयनाड परिसरातदबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान, अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माळी यांनी दिली. दरम्यान, ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे आढळून आल्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *