वरसेत नव्या पाणी पुरवठा योजनेचा ‘भोज्जा’ समोर, वरवर टाकलेली जलवाहिनी जळाली, कामे अर्धवट मात्र जास्तीचा बिल अदा

Share Now

352 Views

रोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीच्या तब्बल साडेतीन कोटी खर्चिक नव्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा कार्यांन्वित होण्याआधीच उडत असलेला भोज्जा शनिवारी दुपारी पुन्हा समोर आला. ठीकठिकाणी पाणी पुरवठयासाठी टाकण्यात आलेल्या एचडीपीई जलवाहिनी मातीत पुरुन सुरक्षीत काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. वरसेत लाखो रुपये खर्चाची पाणी साठवणूक टाकी वगळता इतरत्र कामांना दर्जा नाही. एचडीपीई जलवाहिनीच्या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्या, त्यामुळे जलवाहिन्यांना अवजड वाहनांचा धोका कायम ठेवला. इन्स्टीमेंटनुसार जलवाहिन्यांना काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. मातीत वरवर जलवाहिन्या पुरण्यात आल्याने जलवाहिन्या वारंवार फूटतील, अशा नागरिकांच्या तक्रारी असतानाच शुक्रवारी रात्री कोणी अज्ञाताने रस्त्याला लागून असलेली नवीन पाणीपुरवठा एचडीसीई जलवाहिनी जाळल्याची खळबळजनक घटना घडली आणि संबधीत वादग्रस्त ठेकेदाराने कसे दर्जाहीन काम केले हे अधोरेखीत झाले आहे. दरम्यान, ग्रामीण पाणी पुरवठा योजना तब्बल साडेतीन कोटीची आहे, बहुतेक कामे अर्धवट, निष्क्रीष्ट असताना जवळपास ८0 टक्के बिल कोणत्या सर्व्हेनुसार अदा करण्यात आले, कोणा अभियंता यांनी सर्व्हे केला, असा सवाल आता उपस्थित झाला आहे, तर सबंधीत ठेकेदाराला उर्वरित कामे दर्जेदार आणि कामे पूर्ण झाल्याशिवाय उर्वरीत बिल देणार नाही असा पुर्नउच्चार उपअभियंता युवराज गांगुर्डे यांनी पुन्हा सलाम रायगडजवळ केला आहे.

वरसे ग्रामपंचायत हद्दीतील विविध कामांचा दर्जा, पुराचा पाणी प्रश्न कायम चर्चेत आहे. तालुक्यात वरसेला सर्वाधीक निधी मिळवून देण्याचे काम सर्वच तटकरेंनी नेहमीच केले. पण त्या निधीचा फारसा दर्जेदार विनियोग झालेला नाही. आता रस्त्यांची काम सुरू होत आहेत. भुवनेश्वरमधील रस्ते डांबरीकरणाचे काम निकृष्ट कामाचा लौकीक असलेल्या ठेकेदाराला देण्यात आल्याने आधीच भुवनेश्वर, निवी ग्रामस्थांत नाराजी आहे. तरीही आम्ही रस्त्याचे काम दर्जेदार करून घेऊ असा पवित्रा युवकांनी घेतला. दुसरीकडे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत दर्जेदारपणे पूर्ण होईल असा आशावादही मावळतीला आला. वरसेत बांधण्यात आलेली पाणी साठवणूक टाकी वगळता इतरत्र कामे दर्जेदार करण्यात आलेली नाहीत, अनेक वस्तींना पुरविण्यात येणाऱ्या एचडीपीई जलवाहिन्या वरवर मातीत पुरण्यात आल्या. त्यांना संरक्षीत कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही, याच ठेकेदाराचा फटका अखेर कालवा रस्त्याजवळील जलवाहिनीला बसला. वरवर टाकलेली एचडीपीई जलवाहिनी कोणा अज्ञाताने जाळल्याचे समोर आले आणि नव्या पाणीपुरवठा योजनेच्या दर्जेदार कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.आता इतरत्र एचडीपीई जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे, काम करून घेणाऱ्या मुकादम यांना विचारले असता टाकत असलेली एचडीपीई जलवाहिनी व्यवस्थित मातीत पुरून काँक्रिटीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले. मग आधीच्या जलवाहिन्या वरवर मातीत का पुरल्या, जलवाहिनी जळण्याची घटना घडली यावर मुकादम अक्षरश: निरुत्तर झाले, तर जलवाहिनी मातीत वरवर पुरल्याने जळली असावी, असे सांगत सबंधीत ठेकेदाराला अखेरचे बिल काही झाले तरी अदा करणार नाही, अर्धवट कामे पूर्ण व दर्जेदार करून घेतले जाईल, त्याबद्दल शंका नसावी असे ठोस आश्वासन पुन्हा उपअभियंता युवराज गांगुर्डे यांनी दिल्याने एकंदर नव्या करोडो रुपये खर्चिक पाणीपुरवठा योजनेला भवितव्य काय ? असा सवाल उपस्थित झाला, तर नव्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा अधिक भोज्जा उडण्याला प्रारंभ झाले की काय ? अशी चर्चा आता नागरिकांत सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *