रोठ बुद्रुक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, २१० नागरिकांनी घेतला लाभ

Share Now

326 Views

धाटाव (जितेंद्र जाधव) रोहा तालुक्यातील रोड बुद्रुक येथे तेरणा सह्याद्री हॉस्पिटल व ग्रामपंचायत रोड बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि.( 2) जानेवारी रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबीराचा लाभ विभागातील
२१० नागरिकांनी घेतला.

सदर शिबिराचे उद्घाटन रोह्याचे सुप्रसिद्ध कायदे तज्ञ एड. सुनील सानप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिराला हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव, रोहा
शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, शेडसई सरपंच प्रिया कडू, तेरणा टीम डॉ.अभिजित लोखंडे, डॉ. प्रवीण शिरोडे, रवींद्र कदम, समीर पेटकर यासह धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यातील मॅनेजर यांनी सदिच्छा भेट दिली. या शिबिरात नेत्रतपासणी, ब्लड शुगर, ईसीजी, कान, नाक, घसा यांची शस्त्रक्रिया तसेच किडनीचे आजार, सांध्याची शस्त्रक्रिया मोफत तपासणी करण्यात आले.

या धाटाव विभागातील व माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना आर्थिक परिस्थितीमुळे मोफत औषधोपचार तसेच लांब जाणे परवडत नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात बराच वेळा अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी म्हणून माझ्या ग्रामपंचायतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असे सरपंच नितीन वारंगे यांनी सांगितले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, उपसरपंच वेदीका डाके, सदस्या वैभवी भगत, सदस्या अक्षता वारंगे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, सचिव अलका बामगुडे तसेच गावातील जेष्ठ खेळ वारंगे, दत्ता डाके, गुणाजी घाग यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेश डाके, कार्यध्यक्ष राजेश भगत, समीर वारंगे, विलास डाके, राहुल डाके, शशिकांत साळुंके, निलेश वारंगे, सागर डाके, श्रीकांत दरडे, निरंजन वारंगे, रितेश भाग, श्रद्धा घाग, सुप्रिया वारंगे, अमृता साळुंके, अमृता डाके रोहिणी गोसावी आदींनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *