रोहामधील बहुजनांची सामाजीक भवने उभारण्याचा मानस : खा. सुनिल तटकरे, मराठा समाज भवनासह विविध विकासकामांचे भूमीपूजन

Share Now

439 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करता अठरापगड जाती धर्माचे , बारा बलुतेदार यांना सोबत घेतले. त्याच छत्रपतींचा आदर्श घेत रोहा शहरामध्ये असलेल्या सर्वच बहुजन समाजांची समाज मंदिरे,भवने उभारण्याचा मानस आहे. कुंडलिका नदी संवर्धन सुशोभीकरण प्रकल्पानंतर आता शिवसृष्टी साकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. रोहा शहरात विविध विकासकामे होत आहेत.आज विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहेत. ती कामे लवकरात लवकर पुर्णात्वाला जातील.आज भुमीपुजन करण्यात आलेल्या कामांमध्ये मराठा समाजासाठी देखणी इमारत उभी राहणारे आहे. रोह्यात मराठा समाजाच्या संघटनेच्या स्थापनेपासून समाजाच्या हितासाठी काम करण्यात येत आहेत.ही वास्तू समाजाच्या हितासाठी कार्यान्वित होणार असून येथूनच समाजातील तरुण घडविण्यासाठी काम होणार आहे.येथुन विविध उपक्रम होणार असून आपण मराठा समाजाच्या विविध उपक्रमांना पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे केले आहे.

मंगळवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी रोहा शहरातील
भाटे सार्वजनिक वाचनालय पासून आसिफ कर्जीकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता विकसित करणे,दामजी मेघजी मिल पासून वरचा मोहल्ला रस्ता विकसित करणे,श्री धाविर मंदीर ते सुंदर नगर, मिल्लत नगर पर्यंत रस्ता विकसित करणे,मराठा समाज भवनाचे भुमीपुजन समारंभ प्रसंगी वुमन्स क्लब हाऊस म्हाडा कॉलनी वसहात येथे आयोजित कार्यक्रमात खा.सुनील तटकरे बोलत होते. यावेळी आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस सुरेश मगर, मुख्याधिकारी दयानंद गोरे, माजी नगराध्यक्ष रत्नप्रभा काफरे, सकल मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख,सरफळे रावसाहेब, शहर अध्यक्ष अमित उकडे, लक्ष्मण महाले, माजी उपनगराध्यक्ष रिदवाना शेटे,महेंद्र गुजर, अहमद दर्जी, महेंद्र दिवेकर, राजेंद्र जैन, महेश कोल्हाटकर, सारिका पायगुडे, सरोजीनी शिंदे, सुभाष राजे, चंद्रकांत पार्टे,अनिता शेडगे,राजश्री देसाई,चेतना पार्टे, शैलजा देसाई, मयुर पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमित उकडे यांनी मराठा समाज भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांचे आभार मानले.आपल्या प्रास्ताविकात मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी खा.सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीत घेण्यात आलेल्या रस्ते व मराठा समाज भवनाचे काम दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. यावेळी रोहेकर नागरीक,मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *