गोवे ग्रामपंचायतीने आगामी निवडणुकीत विरोधकांना शून्य मते द्यावीत ; खा. सुनील तटकरेंचे आवाहन

Share Now

421 Views

रोहा (वार्ताहर) मी जरी शरीराने अठरा वर्षाने गावात आलो नसलो तरी या भागामध्ये माझे मन गुंफूण राहिले आहे. कोलाड परीसर तसेच आंबेवाडी जिल्हा परिषद गटात कधीही विकास कामे कमी पडू दिली नाहीत. गोवे ग्रामपंचायतमध्ये 2 कोटी इतकी कामे आज होत आहेत.मागील ग्रामपंचायत निवडणुकीत गोवे ग्रामास्थानी हेवेदावे विसरून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. गावातील सर्वच लोक एकत्र आल्याने या गावाचे भवितव्य उज्वल आहे. त्याच पद्धतीने गोवे ग्रामपंचायतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना शून्य मते द्यावीत असे आवाहन गोवे ग्रामस्थांना खा.सुनील तटकरे यांनी केले. कालपरवा या भागात एक नेता येऊन चार कोटी कामांचा शुभारंभ करत आहोत अश्या बतावण्या करून गेले, त्यांना माझा एकच प्रश्न राहील तुमची कामे कुठे आहेत. तुम्ही एकदा आमदार झालात आता परत पंधरा वर्षे आमदार व्हायला लागतील असा टोला विरोधकांना लगावला. व्यक्तिगत जीवनामध्ये मी डास पण मारत नाही, पण माझ्या वाट्याला जाणा-याना सहजासहजी सोडत नाही. लोकांनी निवडून दिले म्हणून आम्ही सलग निवडून येत खासदार होता आले. गोवे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ. अनिकेत तटकरे, विभागीय नेते रामचंद्र चितळकर, मा. उपसभापती बालकृष्ण बामणे, ज्येष्ठ नेते नारायण धनवी, गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, जिल्हा परिषद गण अध्यक्ष नरेंद्र जाधव, उपसरपंच नितीन जाधव, सरपंच सुरेश महाबळे, रोहा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रितम पाटील, देवकान्हे सरपंच वसंत भोईर, माजी उपसरपंच राम कापसे, विभाग अध्यक्ष प्रकाश थिटे, कोलाड विभाग अध्यक्ष विजय कामथेकर, माजी सरपंच मनोज शिर्के, विभाग नेते तानाजी जाधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यापुढे बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले कि, जुन्या पद्धतीच्या लोकांनी शिक्षण जरी घेतले नसले असले तरी आत्ताच्या पिढी पेक्षा त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. म्हणूनच या भागात डोलवहाल सारखा बंधारा बांधून तालुक्यांत पाणीपुरवठा करणे शक्य झाले. गोवे गावाच्या सभोवताली कुंडलिका व महिसदारा नदीने वेढलेले आहे. अश्या परिस्थिती त शेतीसाठी पाणी उपलब्ध असून पाण्याचा वापर कसा करायचा हाही प्रश्न होता. मात्र तो पाण्याचा प्रश्न सोडावीत आज गावाला मुबलक पाणीपुरवठा करता आला. जिजाऊच्या नावाने महिलांचे 19 बचत गट एकत्र आले आणि मसाले उद्योग स्थापन केले. अनेक वेळा टीव्हीवर इतर कंपन्यांची मसाल्यांची जाहिरात असते, तशीच जाहिरात गोवे ग्रामपंचायत मधील महिलांनी बनविलेल्या मसाल्याची जाहिरात व्हावी आणि संबंध महाराष्ट्राने गोवे गावाच्या महिलांनी बनविलेल्या मसाल्याची चव चाखावी लागेल अशी कामगीरी महिला बचत गटांनी करावी. अश्या कार्यक्षम महिला बचत गटासाठी आ. अनिकेत तटकरे यांच्या निधीतून आंबेवाडी नाक्यावर महिला बचत गट भवन निर्माण केले जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे या भागातील महिलांनी बनविलेल्या गृह उपयोगी वस्तूंचा लाभ कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही घेता येईल. अशाच पद्धतीचे विकास कामाचे पर्व या जिल्हापरिषद गटात सुरू राहतील असे खा. सुनील तटकरेनी सांगितले.

18 वर्षांनंतर गोवे गावात खा. सुनील तटकरे आले असले तरी दरवर्षी विकास कामे त्यांच्या मार्फत होत होती. गोवे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. महिसदारा चे पाणी पुराच्या पाण्याने पलटी होऊन शेती नापीक झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेताला पडलेल्या खांडी बुजविण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध केला जाईल. गोवे ग्रामपंचायत सुजलाम सुफलाम होत आहे. जिल्हा परिषद मतदार संघात 19 ग्रामापंचायत आहेत. गोवे ग्रामपंचायत हद्दीत गरजू विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात आले. त्यामुळे बाकीच्या 18 ग्रामपंचायत मध्ये ही सायकली वाटप करण्यात याव्यात असे आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले. तर
विकासकामांच्या बाबतीत ग्रामपंचायतमध्ये खा. सुनील तटकरे यांनी 4 कोटी 65 लाख कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. खा. सुनील तटकरेंनी गोवे ग्रामपंचायतीला भरभरून विकास कामे दिली. कै.द. ग. तटकरे यांच्या माध्यामातून डोलवहाल बंधारा उभारला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला. मी दारूबंदी साठी प्रयत्न केले, मात्र दारुबंदी झाली नाही याच दुःख माझ्या मनात आहे.खा. सुनील तटकरे यांनी माझ्या गावाची दारू बंदी येत्या 26 जानेवारी पर्यंत करावी असे मत ग्रुप ग्रामपंचायत गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *