माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा,आ. भरत गोगावले आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाली निवड

Share Now

267 Views

महाड (अभिताभ जाधव) रायगड जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत शिवसेनेचे ज्ञानदेव पवार नगराध्यक्षपदी तर
उपनगराध्यक्षपदी सचिन बोंबले विराजमान झाले.यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा मंत्री सुभाष देसाई आणि आ. भरत गोगावले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकप्रतिनिधी राजू साबळे यांचे आणि माणगावकर यांचे विशेष आभार मानले. माणगावकर यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास आ. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. तसेच माणगावकर यांच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आ. गोगावले आणि मंत्री सुभाष देसाई यांनी जबाबदारी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *