गाडीवर नाव प्रेस पण बातमीच बनवता नाय येत ! माणगांव तालुक्यात बोगस पञकारांचा वावर

Share Now

627 Views

वावेदिवाळी इंदापुर (गौतम जाधव) माणगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून बोगस पत्रकारांचा वावर मोठ्या प्रमाणात चालू असून काही धंदेवाले व्यापारी वर्गात संतापत होत आहे. बाजारपेठत कोणाकेडेही जाऊन मी पत्रकार आहे सांगून त्याना धमकावुन सरळ सरळ पैशाची मागणी हे पञकार करीत असतात. तसेच मी एका पक्षाचा तालुका, जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे व पत्रकार सुद्धा आहे माझी पोलिसांजवळ व राजकीय नेत्यांशी वरपर्यत मोठी ओळख असून तुमची मी वाटलावू शकतो अशाप्रकारे माणगांव तालुक्यात इंदापुर विभागात काही बोगस पत्रकारांकडून गेल्या दोन वर्षापासून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

गाडीवर प्रेस हे नाव टाकून हे बोगस पञकार बाजारपेठेतून गाडी फिरवत असतात तसेच कुठल्याही दैनिकाचे यांच्याकडे वार्ताहार, प्रतिनिधी कार्ड नसून तालुका जिल्हा पञकार संघटनेत हे सभासद देखील नाही किवा यांनी बातमी देखील कधी लिहिली नाही, ती बातमी पेपरात छापलेली देखील नाही. अशा या पत्रकारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवुन योग्य ती कारवाई करावी तसेच जनतेने सुद्धा अशा पत्रकारापासुन सावध रहावे. बोगस पत्रकार असुन सुद्धा व्यावसायिकदांराकडून खंडणी मागण्याचे प्रकार चालु आहेत. अशा बोगस पत्रकारांवर वेळीच आळा घातला नाही तर आज जे अधिकृत व सातत्याने शोध पत्रकरिता करीत आहेत लिखाण करीत आहेत अशा पत्रकारांचे नाव खराब होत आहे. समाजात वावरणाऱ्या खऱ्या पत्रकरांच्या नावाला काळीमा लागत असून माणगाव तालुक्यातील बोगस पत्रकरांवर माणगांव पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *