सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जल्लोष !

Share Now

204 Views

कोलाड (कल्पेश पवार) जेष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा वारसा पद्मश्री डॉ.आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवित असलेले सचिनदादा धर्माधिकारी याना मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जल्लोष केला आहे.
                      पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.नानासाहेब 
धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने आध्यात्मिक बरोबरच असे अनेक समाज उपयोगी उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. मग त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, निवारा शेड व पाणपोई, स्वच्छता अभियान यासारखे अनेक उपक्रम राबवून निष्काम श्रमदानातुंन  
केलेल्या या कार्याची महती समाजाच्या अनेक स्तरातील लोकां पर्यन्त पोहचून समाजातील प्रत्येत घटकाला जोडण्याचे काम होत आहे. तर निरुपन बरोबरच असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असलेले सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरेस यांच्या वतीने मानद
डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जलोष केले. तर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या शिकवणी मुले या फोडलेल्या फटाक्या चा कचरा ही श्री सदस्यांनी उचलाला व समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

श्री सदस्यांचा असा ही आदर्श

सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाल्याबद्दल कोलाड येथील श्री सदस्यांचा फटाके फोडुन जलोष केला, पण हा आनंद उत्सव साजरा करीत असताना इतर कुणाला ही याचा त्रास होऊ नये म्हणून श्री सदस्यांनी हा कचरा स्वतः उचलुन येथे स्वच्छता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *