मुंबई गोवा महामार्गावर पोलीस मिनी बस वाहनाला अपघात, दहा पोलीस जखमी, कोलाड हद्दीतील पुगाव येथील घटना

Share Now

242 Views

कोलाड (कल्पेश पवार) मुंबई – गोवा महामार्गवर शुक्रवारी दि.२५ रोजी रुपेश अधिकारी यांच्या पुगाव नाक्याजवळ असणाऱ्या टपरित घुसलेल्या पोलीस वाहनाला अपघात झाल्याची घटना कोलाड हद्दीत घडली आहे.या अपघातात सुदैवाने जीवित हानी टाळली असून,यात १० पोलीस बांधव जखमी झाल्याची घटना घडली आहे
        
याबाबत प्रत्यक्ष दर्शी यांच्याकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार, मुंबई – गोवा महामार्गवर पुगाव हद्दीत रुपेश अधिकारी यांचा ढाबा आहे, याच धाब्याजवळ शुक्रवार दि.२५ रोजी पोलीस वाहन चालक संजय चव्हाण रा.गोरेगाव माणगाव हे आपल्या ताब्यातील पोलीस वाहन क्र.( एम एच 06 के.9930) हे मुंबई गोवा महामार्गावरून आपले वाहन खांब बाजू कडून माणगाव बाजू कडे घेऊन जात असताना सदर मिनी बंद वाहन पुगाव येथील रुपेश अधिकारी यांच्या पुगाव नाक्याजवळ असणाऱ्या सद्गुरू कृपा टपरीत घुसून बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडाला धडक लागून पोलीस वाहनाला अपघात झाल्याची घटना कोलाड हद्दीत घडली आहे.
         
या अपघातात सुदैवाने जीवित हानी टाळली असून,यात१)चव्हाण,२)बोरकर,३)पांचाळ,४)पांचाळ,५)धुळगुडे,६) दळवे,७)लहारे८)चव्हाण ९)मुसळे-,
१०)शेटकर हे दहा पोलीस जखमी झाले असून, यांच्यावर प्राथमिक उपचार केंद्र आंबेवाडी येथे उपचार होत आहेत.

टपरी चालकाचे नुकसान

पोलीस मिनी बस पुगाव येथील रुपेश अधिकारी यांच्या टपरित घुसल्याने या टपरी चालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *