लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी समाजातील चांगल्या लोकांनी पुढाकार घेणे खूप आवश्यक ; डॉ. सनाउल्ला घरटकर

Share Now

174 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) समाजामध्ये चांगले लोक वास्तव्य करून राहत आहेत. समाजातील सर्वांचीच परस्थितीती समतुल्य असत नाही. गरीब व श्रीमंत अशी वर्गवारी होत असते. समाजात वावरत असताना कोणाला कश्याची गरज आहे. हे समाजातील लोकांनी ओळखून एखाद्या दानशूर व्यक्तीची मदत मिळण्यास फार सोपे जात असते. समाजातील चांगल्या लोकांनी पुढाकार घेऊन लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी आरोग्य विषयक सेवा मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिल्यास लोकांचे जीवन वाचणार असून त्यांचे मोठे पुण्य सुद्धा मिळणार आहे. एखाद्याला आयुष्य वाचवले तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत.बयासाठीच लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी लोकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन समाजसेवक व डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी केले आहे.

संजवनी आरोग्य सेवा संस्थेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.या पत्रकार परिषदेत मुरुड शहरातील डायलेसिस सेंटर उत्तमरीत्या कामगिरी बजावत असून लोकांना स्वल्प दरात डायलेसिस करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले जात आहे. या आरोग्य संस्थेस समाजसेवक व डॉ.सनाउल्ला घरटकर यांच्याकडून दोन नवीन डायलेसिस मशीन मोफत भेट देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर आपले विचार प्रकट करताना डॉ. सनाउल्ला घरटकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष विजय सुर्वे, डॉ. मकबूल कोकाटे, राशीद फहीम, मंगेश दांडेकर, अतिक खतीब, कीर्ती शहा, नितीन आंबुर्ले, संचालक जहूर कादरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घरटकर म्हणाले कि, लोकहितासाठी झटणारे सर्व सदस्य हे संजवनी आरोग्य संस्थेत असल्याने त्यांची प्रगती हि निश्चित होणार आहे.समाजातील लोकांचे हित जोपासण्यासाठी ज्या व्यक्ती स्वतःचा वेळ देतात चांगले सामाजिक कार्य करतात.अश्या लोकांना चांगली कामे केल्यामुळे चांगली फळे चाखावयास मिळणार आहेत. तुम्ही दुसऱयासाठी उपयोगी ठरा गरीब लोकांचा सन्मान करा तरच पुढील आयुष्यात यश व प्रगती प्राप्त होणार आहे.शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे प्रत्येक गरीबाचा मुलगा शिकला तरच त्याचे दारिद्र्य दूर होणार आहे. यासाठी आगामी काळात शिक्षणावर अधिक भर देणार असून विविध उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी या संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि, समाजसेवक घरटकर यांच्याकडून आमच्या संस्थेस कारडिक्स ऍम्ब्युलन्स मिळाल्यामुळे आम्ही ७६ रुग्णांचे प्राण वाचू शकलो. संजवनी आरोग्य संस्थेस राज्य शासनाची महात्माफुले आरोग्य योजना मिळाल्यामुळे २७ आजारांवर मोफत उपचार रुग्णांना मिळत असतो.आमच्या संस्थेस घरटकर हे वारंवार मदत करीत असल्यामुळे रुग्णानं चंगली व स्वल्प दरात सेवा मिळत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. डायलेसिस सेंटर चे विभाग प्रमुख डॉक्टर मकबूल कोकाटे यांनी सांगितले कि,मुरुड रोहा, महाड
अलिबाग आदी ठिकाणाहून डायलेसिस करण्यासाठी अनेक रुग्ण याठिकाणी येत आहेत.आमच्या संस्थेमार्फत लवकरच आम्ही डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेणार आहोत. त्याचप्रमाणे हृद्यरोह चिकित्सा शिबीर सुद्धा घेणार आहोत. यामधून अतिगंभीर रुग्णांना तातडीची आरोग्य असुविधा मिळवून देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत संजवनी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *