तब्बल दोन वर्षानंतर विविध समित्यांना ‘मुहूर्त’ सापडला, समन्वय समिती विजय मोरे, संजय गांधी निराधार योजना शिवराम शिंदे, दक्षता समिती हेमंत कांबळे नव्या दमाचे ‘अध्यक्ष’

Share Now

647 Views

रोहा (राजेंद्र जाधव) सामान्यांच्या निगडीत असलेल्या समन्वय समिती, संजय गांधी निराधार योजना, दक्षता समिती कार्यकारणी निवडीला महाविकास आघाडीच्या सरकारला तब्बल दोन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला. कोरोना च्या नावाखाली विविध समिती अध्यक्ष, सदस्यांची निवड करायला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लावल्याने उद्धवा अजब तुझे सरकार असा नाराजीचा सूर नागरिकांतून व्यक्त झाला. महत्वाची समन्वय समिती कार्यरत नव्हती, त्यामुळे रोहा शहर यांसह संबंध तालुक्यातील विकासकामांचा दर्जा घसरला, सबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांना जाब विचारता आले नाही. संजय गांधी योजनेच्या लाभार्थींचेही प्रचंड हाल झाले. दक्षता समिती नसल्याने रास्त धान्य वितरणातही गोंधळ दिसून आला. अखेर दोन वर्षानंतर सरकारला मुहूर्त सापडला आणि जिल्ह्यात समन्वय समिती, संजय गांधी निराधार योजना, दक्षता समितीच्या नियुक्त्या झाल्या. रोहा समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विजय मोरे, संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी शिवराम शिंदे, दक्षता समिती अध्यक्षपदी हेमंत कांबळे अशा नव्या दमाच्या नेत्यांची निवड करण्यात आली. समन्वय समितीत सेनेचे उद्देश वाडकर, भाग्यश्री भगत, दक्षता समितीत उर्वशी वाडकर, सचिन फुलारे, नितीन वारंगे सेना कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली हे सर्व सदस्य अलिबाग विधानसभा समावेश रोहा मतदारसंघातील आहेत, दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसंघ समावेश रोहा सेना पदाधिकाऱ्याला जाणीवपूर्वक प्रतिनिधित्व नाकारण्यात आले, अशी प्रतिक्रीया तालुकाप्रमुख समिर शेडगे यांनी दिली. श्रीवर्धन समावेश रोहा सेनेला नो एन्ट्री केल्याने राष्ट्रवादी विरुद्ध सेना असा वाद कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

तालुकावार समन्वय समिती, संजय गांधी निराधार योजना, दक्षता समिती नव्याने कधी कार्यान्वित करणार ? याचे उत्तर ठाकरे सरकारने तब्बल दोन वर्षानंतर दिले. जिल्ह्यातील विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. मूळात समित्या अडीच वर्षे कार्यरत नसल्याने सामान्यांच्या तक्रारी तशाच पडून राहिल्या. तालुका सर्वच ग्रामपंचायती, विविध खात्यांतून झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली, पण जाब विचारावा कोणाला, ग्रामपंचायतीत ग्रामसभा नाहीत, ग्रामसेवक उत्तर देत नाहीत अशा कैचीत ग्रामस्थ अडकले. त्यातून मस्त चाललेय आमचं अशीच अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांची मिलीभगत समोर आली. निकृष्ट कामांबाबत स्पष्ट नाराजी सलाम रायगडने खुद्द खा. सुनिल तटकरे त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरेंसमोर व्यक्त केली. समन्वय समिती अनुषंगाने लवकरच सभा घेऊ असे ठोस आश्वासन खा. तटकरेंनी दिले होते. त्यानंतर आता सर्वच समित्या कार्यरत झाल्या. संजय गांधी योजना लाभासाठी अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत, रास्तभाव धान्य पुरवठा विभागातही सावळा गोंधळ सुरु आहे. मुख्यत: पुरवठा विभागात असणारे तत्कालीन निलंबित सिराज तुळवे यांना हटविण्याच्या मागणीला आता अधिक बळ मिळतो का ? हे समोर येणार आहे. समन्वय समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते विजय मोरे, सदस्यपदी राकेश शिंदे, हरिचंद्र वाजंत्री, महेंद्र हंबीर, उद्देश वाडकर, बाबुराव बामणे, मितेश कल्याणी, अंजली कुंडे, भाग्यश्री भगत, दक्षता समितीच्या अध्यक्षपदी हेमंत कांबळे, सदस्यपदी प्रकाश थिटे, सुजाता जवके, उर्वशी वाडकर, रविना मालुसरे, जानू कोकरे, साजिद खान, सचिन फुलारे, नारायण पवार, सुरेश जाधव, नितीन वारंगे तर संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी शिवराम शिंदे सदस्यपदी प्रगती बामुगडे, सतिश भगत, गहिनीनाथ कटारे, संजय मांडलुस्कर, अल्ताफ चोरडेकर, कुलदीप सुतार, अनिल पाटील, रघुनाथ करंजे यांची निवड करण्यात आली आहे.

रोहा विविध समित्या निवडीत अलिबाग विधानसभा रोहा मतदारसंघात शिवसेनेला अंशतः प्राधान्य देण्यात आले. महत्वाच्या समन्वय समितीवर सेनेचे चणेरा शाखाप्रमुख उद्देश वाडकर, ऍड भाग्यश्री कुंडे यांचा समावेश झाल्याने एकसत्ता विरोधातून लोकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त झाली. धान्य वाटप पुरवठा विभागावर वर्षानुवर्षे वर्चस्व असलेल्या प्रचंड वादग्रस्त दक्षता समितीवर सेनेच्या उर्वशी वाडकर, सचिन फुलारे, नितीन वारंगे सेनेला वाटा दिला, तर संजय गांधी निराधार योजनेवर सेनेचे एकमेव कुलदीप पवार यांची निवड करण्यात आली. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार असल्याने समन्वय समिती अथवा दक्षता समिती अध्यक्षपदी सेनेचा नेता असायला हवा होता असा सूर सेनेतून अप्रत्यक्ष आळविला गेला. किमान दक्षता समिती अध्यक्षपदी समीर शेडगे यांची निवड अपेक्षित मानली जात होती. पण राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. श्रीवर्धन विधानसभा रोहा मतदारसंघातील एकाही सेना कार्यकर्त्याला जाणीपूर्वक प्राधान्य दिले नाही अशी स्पष्ट नाराजी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी व्यक्त केली. तर विविध समितीत असलेले सेना सदस्य नेमकी काय भूमिका बजावतात, पंचायत समिती, अनेक ग्रा पं.त तक्रारींतील निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी आग्रही राहतात का, सेनेचे सदस्य कितपत धाडस करतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *